Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार

बुधवार, 13 मे 2026. वैशाख कृष्ण एकादशी

राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30

आज उत्तम दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची मीन रास असून विष्कभ योग शांती करून घेणे.

13 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान असून उंच पुरे व दिसायला चांगले असतात. दुसऱ्याला अडीअडचणीच्या वेळी मदत करायला आवडते. मोठ्या हुद्द्याच्या जागा व पैसा मिळतो वयाच्या 31 व्या वर्षापासून खरं आयुष्य सुरू होते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती व चिकाटी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता. प्रकृती सुदृढ असते. तुमची स्मरणशक्ती उत्तम असते .जीवनात अनेक प्रेमप्रसंग येतात. जीवनात जे मिळवायचे असते ते शांतपणे गाजावाजा न करता मिळवावे असे तुम्हाला वाटते. जर तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव झाल्यास अशक्य असे काहीच जीवनात नसते. तुमच्या योजनांमध्ये बरेच बदल होतात. हुशार व बुद्धिमान वर्तुळातच वावरणे तुम्हाला आवडते.
हर्षल ग्रहामुळे बऱ्याच वेळा जीवनात विचारात विरोधाभास असतो. हर्षल हा स्फोटक ग्रह असल्यामुळे जीवनात बरेच चढ-उतार होतात .अपेक्षित गोष्टी होण्यापेक्षा अनपेक्षित व विलक्षण गोष्टी झाल्याचा अनुभव जास्त येतो .कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. उत्साह ,प्रगती ,जोम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही संयमाने वागता. तुम्ही हुशार ,तल्लख, शास्त्राची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे ,झटपट काम करणाऱ्या आहात. हातातील कामात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता. जीवनातील रुढी आणि बंधने याचा तिरस्कार असतो. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते .खोटेपणा तुम्हाला खपत नाही .नाविन्य व प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्य आहे. तुम्ही समाजप्रिय असता. जीवनात सतत बदल असावा या चमत्कारिक आवडीमुळे मैत्र परिवाराही सतत बदलत असतो .डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात यश मिळते. परंतु हट्टीपणा आणि उद्धटपणा यामुळे तुम्हाला अडचणी येतात. पैशाच्या बाबतीत नशीबवान असतात .तुम्ही शब्दात आणि कृती थांब असतात. आयुष्यात अनेक अडचणी विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .पैशाच्या बाबतीत जीवनात अनेक बदल होतात आणि हे बदल आकस्मिक रित्या होतात .तुम्ही मग पैसा मोठ्या प्रमाणात ठेवला नाही तरी श्रीमंतीचा आब ठेवू शकता .वयाच्या 40 नंतर आर्थिक स्थैर्य मिळते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता अनेक गोष्टीत रस असतो. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करता .तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. तुम्ही तामसी असून काही वेळा कठोरपणा दिसतो .

शुभ दिवस :-सोमवार, शुक्रवार शनिवार

शुभ रंग :- निळा ,पिवळा ,नारंगी .

शुभ रत्न :-पाचू ,पुष्कराज हिरा

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रिणींनो आज
आज कामात नवीन कल्पना सुचतील. वरिष्ठांकडून मदत मिळू शकते. भावनिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.अचानक घरगुती खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीत सावध राहा.

♉ वृषभ

मैत्रिणींनो आज
भाग्याची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा धार्मिक कार्यात यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता.

♊ मिथुन

मैत्रिणींनो आज
मन थोडं गंभीर राहू शकतं. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. जुन्या अडचणींवर उपाय सापडेल. संयम ठेवणं महत्त्वाचं.स्वतःवर विश्वास ठेवा.

♋ कर्क

मैत्रिणींनो आज
आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. मैत्र किंवा जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान उपयोगी ठरेल.

♌ सिंह

मैत्रिणींनो आज
कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. अचानक बदल स्वीकारावे लागू शकतात. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

♍ कन्या

मैत्रिणींनो आज
शिक्षण, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदारासोबत संवाद सुधारेल. नवीन संधी चालून येईल.

♎ तुला

मैत्रिणींनो आज
आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. कामात शांतपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज
प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात प्रगती होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

♐ धनु

मैत्रिणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आई किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चर्चा होऊ शकते.

♑ मकर

मैत्रिणींनो आज
आज संवादकौशल्यामुळे कामात यश मिळेल. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. मैत्रिणीसोबत चे जुने मतभेद दूर होतील.

♒ कुंभ

मैत्रिणींनो आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन काम किंवा व्यवसायात प्रगती दिसेल. मनस्वास्थ चांगले राहील.तांत्रिक, क्रिएटिव्ह किंवा संशोधन क्षेत्रातील महिलांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील.

♓ मीन

मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज आत्मविश्वास वाढेल. अंतर्मनाचा आवाज ऐका. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमू शकतं. नवीन काही सुरुवातीसाठी दिवस चांगला आहे. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular