Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार महिलांसाठी ज्योतिष

रविवार, 10 मे 2026. वैशाख शुक्ल अष्टमी/नवमी

राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर/दुपारी 12:13 नंतर कुंभ

10 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांची परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात. इतरांची माहिती तुम्ही गुप्त ठेवतात. त्यामुळे तुम्ही विश्वासू असतात. तुम्ही व्यावहारिक सल्ला उत्तम प्रकारे देतात. तुम्हाला घराचा फारसा ओढा नसतो. तुम्ही अभ्यासू आहेत. जबाबदारीच्या जागा तुम्ही पैलू शकतात. तुमचा स्वभाव धडपडा असतो. तुम्हाला मोठेपणा आणि प्रतिष्ठा मनापासून आवडते. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्हाला चांगले यश मिळते. तुम्ही तत्परतेने इतरांना मदत करतात. वयाच्या ४६ व्या वर्षी उत्कर्ष होतो. तुमची आवड नेहमी उच्च दर्जाची असते. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रां बद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात. अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात. हट्टीपणा, उतावीळपणा आणि स्वार्थीपणा टाळला पाहिजे.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.

शुभ रंग:- सोनेरी,पिवळा, हिरवा.

शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रिणींनो आज
आज मैत्रमंडळी आणि सामाजिक संपर्कातून लाभ मिळू शकतो. नवीन योजना किंवा प्रोजेक्टसाठी दिवस अनुकूल आहे. उत्साहात अति घाई करू नका.

♉ वृषभ

मैत्रिणींनो आज
कामातमध्ये सकारात्मक बदल दिसतील. पतीचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते.

♊ मिथुन

मैत्रिणींनो आज
प्रवास, शिक्षण किंवा नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. नशिबाची साथ मिळेल. दूरच्या व्यक्तीकडून शुभ बातमी मिळू शकते.

♋ कर्क

मैत्रिणींनो आज
आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. अचानक खर्च किंवा बदल होऊ शकतात. मन शांत ठेवून निर्णय घ्या.उष्णतेचे विकार होऊ शकतात.

♌ सिंह

मैत्रिणींनो आज
नातेसंबंध आणि भागीदारीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जोडीदारासोबत संवाद स्पष्ट ठेवा.मतभेद होऊ शकतात.

♍ कन्या

मैत्रिणींनो आज
कामाचा वेग वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येतील पण तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.उन्हात काळजी घ्या.

♎ तुला

मैत्रिणींनो आज
आजचा दिवस आनंददायी आणि सर्जनशील राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. शैक्षणिक यश लाभेल.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज
घरातील वातावरणात काही बदल होऊ शकतात. कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. भावनिक संतुलन ठेवा.घरगूती वातावरण शांत ठेवा.

♐ धनु

मैत्रिणींनो आज
संवादातून लाभ मिळेल. नवीन संपर्क आणि छोट्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल.

♑ मकर

मैत्रिणींनो आज
सकाळपर्यंत चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास चांगला राहील. दुपारनंतर आर्थिक विषयांवर अधिक लक्ष द्यावे लागेल.कटू बोलणे टाळा.

♒ कुंभ

मैत्रिणींनो आज सकाळचे सत्र कंटाळवाणी असेल.
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत आल्याने ऊर्जा आणि उत्साह वाढेल. व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसेल. नवीन सुरुवातीसाठी योग्य वेळ आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग.

♓ मीन

मैत्रिणींनो आज महत्वाची कामे सकाळीच उरकून घ्या.
मन थोडे संवेदनशील राहू शकते. विश्रांती आणि मानसिक शांततेची गरज भासेल. ध्यान किंवा प्रार्थना लाभदायक ठरेल.चिडचिड टाळा.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular