Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार

शुक्रवार, 8 मे 2026
वैशाख कृष्ण षष्ठी/सप्तमी

राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12

आज दुपारी 12 पर्यंत चांगला दिवस .भद्रा दुपारी 12:22 नंतर
आज जन्मलेल्या बाळाची राशी मकर असून विष्टी करण शांती करणे.

8 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर क्षणी बुद्ध शुक्र या ग्रहांचा संमिश्र प्रभाव असतो.
तुमच्यावर शनिदेवांचा प्रभाव असल्याने तुमचा कल विरक्ती कडे किंवा मुक्ती कडे असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात. कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा आहे. तुमच्या समाज प्रक्रिया त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येतात। आयुष्यात प्रत्येक बाबतीत विलंब होतो त्यामुळे पैसे मिळवण्यातही अडचणी येतात. कष्टाच्या मानाने यश फार उशिरा मिळते.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.

शुभ रंग:- राखाडी.

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रिणींनो आज दशमात चन्द्र आहे.
आज कामात नवीन संधी मिळू शकतात. अचानक बदल स्वीकारावे लागतील. आत्मविश्वास ठेवा, पण रागावर नियंत्रण ठेवा.

♉ वृषभ

मैत्रिणींनो आज भाग्यात चन्द्र आहे.
नशिबाची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते.

♊ मिथुन

मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.
मनात अनेक विचार सुरू राहतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. गुप्त गोष्टी किंवा जुने विषय समोर येऊ शकतात.वाहन जपुन।चालवा.

♋ कर्क

मैत्रिणींनो आज सप्तमात चन्द्र आहे.
नातेसंबंधात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत संवाद स्पष्ट ठेवा. जोडीदाराकडून लाभ होऊ शकतो.

♌ सिंह

मैत्रिणींनो आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
कामाचा ताण वाढेल पण तुमची मेहनत लक्षात येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात.

♍ कन्या

मैत्रिणींनो आज पंचमात चन्द्र आहे.
सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल. प्रेमात यश.अकल्पित धनलाभाचे योग. विद्यार्थिनींसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस आहे.

♎ तुला

मैत्रिणींनो आज चतुर्थात चन्द्र आहे.
घरातील वातावरणात काही बदल होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक ठरेल. मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज तृतीया त चन्द्र आहे.
संवादातून लाभ मिळेल. नवीन ओळखी आणि संपर्क फायदेशीर ठरतील. छोट्या प्रवासाची शक्यता आहे.

♐ धनु

मैत्रिणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकाल. अचानक लाभाची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.

♑ मकर

मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे. व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसेल.अचानक फायदा होईल.

♒ कुंभ

मैत्रिणींनो आज व्ययस्थानी चन्द्र आहे.अनपेक्षित खर्च होऊ शकतो.
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. जुने विचार किंवा आठवणी त्रास देऊ शकतात. ध्यान आणि शांतता लाभदायक ठरेल.

♓ मीन

मैत्रिणींनो आज लाभात चन्द्र आहे.
मित्र आणि सामाजिक संपर्कातून नवीन संधी मिळतील. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.अचानकपणे लाभ घडेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर..
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular