लातूर प्रतिनिधी वार
सोमवार, 4 मे 2026. वैशाख कृष्ण तृतीया
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
आज चांगला दिवस आहे
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक असून विष्टी करणं ,परिघ योग शांती करून घेणे.
4 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे हर्षल ग्रहामुळे बऱ्याच वेळा जीवनात विचारात विरोधाभास असतो. हर्षला स्फोटक ग्रह असल्यामुळे जीवनात बरेच चढ-उतार होतात .अपेक्षित गोष्टी होण्यापेक्षा अनपेक्षित व विलक्षण गोष्टी झाल्याचा अनुभव जास्त येतो .कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. उत्साह ,प्रगती ,जोम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही संयमाने वागता. तुम्ही हुशार ,तल्लख, शास्त्राची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे ,झटपट काम करणाऱ्या आहात. हातातील कामात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता. जीवनातील रुढी आणि बंधने याचा तिरस्कार असतो. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते .खोटेपणा तुम्हाला खपत नाही .नाविन्य व प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्य आहे. तुम्ही समाजप्रिय असता. जीवनात सतत बदल असावा या चमत्कारिक आवडीमुळे मैत्र परिवाराही सतत बदलत असतो .डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात यश मिळते. परंतु हट्टीपणा आणि उद्धटपणा यामुळे तुम्हाला अडचणी येतात. पैशाच्या बाबतीत नशीबवान असतात .तुम्ही शब्दात आणि कृती थांब असतात. आयुष्यात अनेक अडचणी विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .पैशाच्या बाबतीत जीवनात अनेक बदल होतात आणि हे बदल आकस्मिक रित्या होतात .तुम्ही मग पैसा मोठ्या प्रमाणात ठेवला नाही तरी श्रीमंतीचा आब ठेवू शकता .वयाच्या 40 नंतर आर्थिक स्थैर्य मिळते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता अनेक गोष्टीत रस असतो. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करता .तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. तुम्ही तामसी असून काही वेळा कठोरपणा दिसतो .
शुभ दिवस :-सोमवार, शुक्रवार शनिवार
शुभ रंग :- निळा ,पिवळा ,नारंगी .
शुभ रत्न :-पाचू ,पुष्कराज हिरा
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रिणींनो आज
आज मन थोडं अस्थिर राहू शकतं. नात्यांमध्ये गैरसमज टाळा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. आर्थिक बाबतीत सावध राहणं आवश्यक.
♉ वृषभ
मैत्रिणींनो आज
आज तुमच्यासाठी नातेसंबंध महत्त्वाचे ठरतील. जोडीदारासोबत संवाद वाढवा. कामात सहकार्य मिळेल, पण भावनिक निर्णय टाळा.
♊ मिथुन
मैत्रिणींनो आज
आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं. कामाचा ताण वाढू शकतो. लहान-मोठ्या गोष्टींवर जास्त विचार करू नका.
♋ कर्क
मैत्रिणींनो आज
आज सर्जनशीलता वाढेल. आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. प्रेमसंबंधात थोडी चढ-उतार स्थिती राहू शकते.
♌ सिंह
मैत्रिणींनो आज
घरगुती वातावरणात थोडा तणाव जाणवू शकतो. आई-वडिलांशी शांततेने बोला. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
♍ कन्या
मैत्रिणींनो आज
आज संवादातून यश मिळेल. नवीन ओळखी उपयोगी पडतील. प्रवासाची शक्यता आहे. आत्मविश्वास ठेवा.
♎ तुला
मैत्रिणींनो आज
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो. नात्यांमध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे.
♏ वृश्चिक
मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे भावनिक तीव्रता वाढेल. स्वतःवर नियंत्रण ठेवा. निर्णय घेताना घाई करू नका.
♐ धनु
मैत्रिणींनो आज
आज थोडी मानसिक चिंता राहू शकते. ध्यान-योग केल्यास फायदा होईल. गुप्त शत्रूं पासून सावध राहा.
♑ मकर
मैत्रिणींनो आज
सवंगड्यांकडून मदत मिळेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
♒ कुंभ
मैत्रिणींनो आज
कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचा दबाव येऊ शकतो. संयम आणि मेहनत यामुळे यश मिळेल.
♓ मीन
मैत्रिणींनो आज
आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा धार्मिक कार्यात सहभाग होऊ शकते. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.