Homeईपेपरमाजी मंत्री श्री विनायकराव पाटील यांच्या प्रवेशा मुळे मतदारसंघात शिवसेनला चांगले दिवस...

माजी मंत्री श्री विनायकराव पाटील यांच्या प्रवेशा मुळे मतदारसंघात शिवसेनला चांगले दिवस येतील ..

प्रतिनिधी ठाणे मुंबई दिनांक 27/4/2026 गंगुबाई शिंदे सभागृह ठाणे येथे माजी मंत्री श्री विनायकराव पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना धनुष्यबाण हातात देऊन रितसर प्रवेश दिला. श्री विनायकराव पाटील यांच्या प्रवेशा मुळे मतदारसंघात शिवसेनेला चांगला फायदा होणार. भविष्यात जर श्री एकनाथ शिंदे यांनी यांना जर जिल्हायाचे नेतृत्व करण्याची संधी दिली तर शिवसेना वाढण्यास मदत होईल यात शंका नाही.मराठा चेहरा सर्व जाती धर्माच्या कार्यकर्तेयाना सोबत घेऊन चालणारा एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्री पद आसो साधा आमदार असो आपल्या प्रामाणिक पणाने जनतेची सेवा केली. त्याच्या कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग नाही. स्वच्छ प्रतिमेचा मिथ्य भाषी म्हणून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मतदार संघात आपल्या नावाला जपून ठेवून काम केले. त्या मुळे आता शिवसेना जिल्ह्यात जोर धरणार.शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख असो या मुख्य सचिव असो मागिल काळात जे कोणी कार्यकर्ते नेते शिवसेना हि फक्त आपल्या पुरतीच चालवली आपल्या स्वार्थासाठी कधी भाजपला मॅनेज तर कधी काँग्रेस ला मॅनेज झाले व आपला स्वार्थ साधला. मागच्या नगर परिषद च्या निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा प्रमुख तिन्ही चांगल्या प्रकारे काम केले नाही.जे कोणी कार्यकर्ते निवडणूक लढवली त्यांनी तरी आर्थिक घोटाळा केला असा आरोप केला जात आहे. त्या साठी पक्षाने मागील काळात जे कोणी पदाधिकारी असतील त्यांचा अहवाल पाहून नेतृत्व बदल करणे गरजेचे आहे. श्री विनायकराव पाटील यांच्या वर संपुर्ण जिल्हायाची जवाबदारी देवून काम करण्याची संधी मिळावी अशी चर्चा कार्यकर्त्या तुन होताना दिसत आहे.आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवसेना संघटनात्मक बांधणी कशी करतील या कडे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular