Homeईपेपरलातूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री मंगेशजी कुडाळकर यांचा झंझावाती दौरा ..बैठका.

लातूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री मंगेशजी कुडाळकर यांचा झंझावाती दौरा ..बैठका.

लातूर प्रतिनिधी दिनांक 13/4/2026 लातूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार श्री मंगेश कुडाळकर यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाली .पहिल्यांदाच शिवसेनेतर्फे लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, निलंगा व औसा या सर्व विधानसभा मतदारसंघांतील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली.प्रयेक विधानसभा मतदारसंघ बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यांना योग्य मार्गदर्शन करून शिवसेना पक्ष्याविषयी ध्येय धोरण संघटनात्मक कामाची बांधणी कशी करायची यावर सविस्तर मार्गदर्शन केले ..कार्यकर्त्याने त्यांचे मार्गदर्शन व्यवस्थितरीत्या श्रवण करून आनंद व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये बैठकी चांगल्या परीने पार पडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात (SIR)राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी फेर तपासणी अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती .या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अवैद्य मतदारांना यातून वगळणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन आमदार श्री मंगेश कुडाळकर यांनी या बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आढावा बैठक घेण्यात आली. या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अवैध मतदारांना यादीतून वगळणे, तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लातूर लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून मान्यवर पदाधिकारी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. या बैठकीत सर्व आजी-माजी पदाधिकारी माजी आमदार शिवसैनिकांचा मान राखून त्यांच्या सूचना व मत ऐकून घेऊन लातूरमध्ये विकास कामांना गती कशी देता येईल व सर्वांना सोबत घेऊन शिवसेना अधिक बळकट कशी करावी यावर सकारात्मक चर्चा केली ..याप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी सहकारी माजी आमदार सर्व जिल्हाप्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेकांचा प्रचंड उत्साह संघटनात्मक बळ आणि एकजूट पाहून आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने कार्य करण्याची नवी मिर्जा मिळावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेना अधिक बळकट अधिक जोमाने कार्य कर्त्यासाठी व जनतेच्या सेवेसाठी आपण सर्वजण एकजुटीने कार्यरत राहू व लातूर जिल्ह्यामध्ये आपली शिवसेना कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या पाठीशी उभे राहिले अशी ग्वाही त्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular