लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार :-
बुधवार, 8 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण षष्ठी
राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30
आज संध्याकाळी 7 वा पर्यंत चांगला दिवस .आज जन्मलेल्या बाळाची रास धनू(मूळ नक्षत्र)
8 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनी आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे शांतता व एकांत याची आवड असते शास्त्रीय संगीताची आवड असून गंभीर संगीत जास्त आवडते शिस्त नियमितता टापटीपणा आवडतो भविष्याबद्दल काळजीपूर्वक निर्णय घेता काही गोष्टीबद्दलही अतिशय काळजीपूर्वक विचार करतात इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणे हुशार व गंभीर असतात तुमच्यावर मंगळ ग्रहाचा ही अंमल असल्यामुळे धाडस तडफ तत्परतात दाखवते नेहमी आक्रमक असून ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही तुमच्या बोलण्यात युक्तिवाद व अथवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश मात्र चांगलाच असतो खेळाची शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असेल शिस्तीचे भोगते असून निश्चय स्थिर व कर्तव्य तत्पर असतात शनी ग्रहामुळे दोन्ही बाजूने विचार करण्याची क्षमता असते महत्त्वकांक्षी असून दीर्घोउद्योग्य असतात हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते तुमची वृत्ती संशयी असून चिवटपणा असतो कार्यशील कार्यक्षम असून अधिकार गाजवणारे असतात तुमच्याबद्दल काही वेळा गैरसमज करून घेतले जातात समाजात जरी वावरत असला तरी एकटेपणाची जाणीव होत असते गरिबांबद्दल आदर दाखवतात तुमच्या स्वभाव तापट आहे मित्रमंडळींबद्दल बद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूनेही लढण्यास तुम्ही तयार असता जीवनातील विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लागणारा अधिकार व चक जोर तुमच्याकडे आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत अडचणी विलंब याचा जीवनात भरपूर अनुभव येतो इतरांना ज्यावेळी मदतीची जरूर भासते त्यावेळी ते तुमच्याकडे येतात याचे कारण तुम्ही इतरांच्या समस्या उत्तम तऱ्हेने समजू शकता जीवनात आपण अधिकार गाजवावा याबद्दल तुम्हाला ओढ असते तुमच्या दीर्घोउद्योगाने तुम्ही इतरांना उदाहरण घालून देता मात्र यामुळे तुमचे का मित्रांकडून होण्यात तुम्हाला अडचणी येतील अशा प्रसंगी कष्टी न होता तेवढे तेवढ्यापुरते तुम्हाला निराशा येते जीवनात काही अर्थ नाही असा मनात विचार येतो यातून तुम्ही जरूर सावरावे आर्थिक बाबतीत उशीर व अडचणी याचा अनुभव येतो जन्मभर कष्ट त्या प्रमाणात आर्थिक आवक मर्यादित स्वरूपात असते परंतु लाभदायक ठरल्यास अकस्मात पैसा मिळतो तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असतात कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणारा मुले व नवरा महत्व यांच्या महत्वकांक्षासाठी त्या करणारा असा समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते अल्ल स्वभावामुळे प्रेमात अडचणी येतात आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करतात कल्पकता बुद्धिमत्ता नीतिमत्ता उत्साह कार्यक्षमता आहे अशा लोकांबद्दल तुम्हाला आकर्षण असते
शुभ दिवस- बुधवार गुरुवार शनिवार
शुभ रंग :– गडद निळा काळा जांभळा
शुभ रत्ने:- नीलम काळा मोती किंवा काळा हिरा
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली तपासून पहावी)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज ऊर्जा खूप असेल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ. पण घाईत निर्णय घेऊ नका.अचानक फायदा किंवा चांगली ऑफर मिळू शकते. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. नात्यांमध्ये संयम ठेवा.कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन लागेल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. मनात थोडा गोंधळ असला तरी योग्य मार्ग सापडेल.अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये अचानक संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामात लक्ष केंद्रित ठेवा.नवीन करार करताना नीट कागदपत्रे वाचा.श्री गणेश उपसना करा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज कामाच्या धावपळीमुळे कुटुंबासाठी वेळ कमी मिळू शकतो. त्यामुळे थोडा वेळ काढून संवाद साधणे आवश्यक आहे.मोठे खर्च नसले तरी खर्चावर नियंत्रण ठेवा.
कामाचा तणाव वाढेल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज लाभाचे संकेत आहेत, विशेषतः क्रिएटिव्ह किंवा साइड इनकममधून.रोमँटिक वातावरण राहील. मुलांकडून आनंद मिळेल. नात्यांमध्ये उत्साह आणि जवळीक वाढेल.अतिउत्साह टाळा.
आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.तुळशीला पाणी घाला,दिवा लावा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
घराशी संबंधित खर्च वाढू शकतो—जसे दुरुस्ती, सजावट किंवा आवश्यक वस्तू. खर्च करताना नियोजन ठेवा.घरातलं वातावरण शांत ठेवा.
नात्यांमध्ये स्पष्टता येईल. जोडीदारासोबत वेळ घालवा. नवीन पार्टनरशिपसाठी दिवस चांगला.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज एखादी छोटी पण अनपेक्षित संधी मिळू शकते, जी पुढे मोठा फायदा देईल.भावंडांसोबत संबंध सुधारतील. मित्रांशी संवाद वाढेल. सोशल मीडिया किंवा संपर्कातून नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात.
कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही व्यवस्थित हाताळाल. आरोग्याची काळजी घ्या.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज कुटुंबात संवाद महत्त्वाचा ठरेल. बोलताना थोडं संयम ठेवा—कठोर शब्द टाळा. नात्यांमध्ये गोडवा ठेवणे गरजेचे आहे.
प्रेमसंबंधात उत्साह आणि रोमँटिक वातावरण राहील. सर्जनशील कामात यश मिळेल.डाळिंब दान करा
♐ धनु
मैत्रीणींनो आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.नवीन काम सुरू करणे, निर्णय घेणे किंवा पुढाकार घेणे—यासाठी उत्तम वेळ आहे. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल.
घरगुती जीवनात बदल होऊ शकतात. आईशी संबंधित गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. स्थिरता राखा.
पिवळ्या मिठाई चे दान करा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज अनपेक्षित खर्च वाढू शकतात. विशेषतः प्रवास, आरोग्य किंवा घरगुती गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे. पैशाचे नियोजन करूनच खर्च करा.
संवादातून कामे पूर्ण होतील. लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत चांगला दिवस. अचानक लाभ मिळू शकतो.अडकलेली रक्कम मिळू शकते , खर्चावर नियंत्रण ठेवा.अचानक नवीन संधी, प्रोजेक्ट किंवा ओळखीमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
♓ मीन
मैत्रीणींनो आज आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल. नवीन संधी मिळतील.
मंगळाचा प्रभाव तुमच्यात धाडस आणि निर्णयक्षमता वाढवेल—महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे.गुंतवणूक विचारपूर्वक करा.पिवळे वस्त्र वापर करा.
✨ उपाय:
आज हनुमान चालीसा पठण करा किंवा हनुमानजींची पूजा करा. त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन धैर्य आणि यश वाढेल. निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.