लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर शुक्रवार, 3 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण प्रतिपदा
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
आज उत्तम दिवस आहे. . आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ(व्याघात योग)
3 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. मंगळ स्पष्टवक्ता, शीघ्रकोपी, अतिश्रम करणारा तर हर्षल अकल्पित घटना घडवून आणणार आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात आणि सतत प्रगती करण्याचा तुम्हाला ध्यास लागलेला असतो. तुम्हाला धार्मिक गोष्टींबद्दल ओढ असली तरी कर्मकांडावर तुमचा विश्वास नसतो. तुम्ही दानशूर असतात मात्र त्याचे प्रदर्शन करतात. तुम्हाला न्यायाचे आवड असते. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात. उत्साही आहात आणि सतत कार्यमग्न असतात. तुम्ही कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमच्या अंगावर आलेली जबाबदारी तुम्ही योग्यपणे पार पाडू शकतात. इतरांनी तुमच्या कामात लुडबुड केलेली तुम्हाला आवडत नाही. तुमच्या डोकं जर तुम्ही शांत ठेवले तर जीवनात तुम्ही अधिक प्रगती करू शकाल. तुम्ही हट्टीपणा टाळला पाहिजे. तुम्ही शुद्ध प्रेम करणारे, दयावान आणि नीतिमान आहात. तुमच्यात आत्मविश्वास पुरेपूर भरलेला आहे. तुम्हाला इतरांच्या सल्ल्याची गरज पडत नाही. तुमचे वागणे रुबाबदार असून टापटीप आणि व्यवस्थित पण आढळतात. तुम्हाला उत्तम संभाषण शैली लाभलेली आहे. आणि तुम्ही बोलण्यात मोकळेढाकळे असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो आणि स्वभाव मिश्किल असतो. सहसा इतरांचा द्वेष किंवा मत्सर तुम्ही करत नाहीत.खर्चिक वृत्ती असून आयुष्य आरामदायी कसे जाईल या कडे लक्ष असते.पैशांवर आधारित सर्व सुख उपलब्ध होतात. इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते.तुमचा स्वभाव हरहुन्नरी असून कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाहीत. तुम्ही अतिशय प्रेमळ व निष्ठावान आहात .स्वभाव लहरी असून कृतीने हळवे आहात. पतीला योग्य ती सर्व साथ देण्यात तुम्ही वाकबगार असतात. उत्तम सह धर्मचारणी म्हणून लौकिक मिळवता.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- किरमिजी.
शुभ रत्ने:- पुष्कराज, मोती
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज चन्द्र सप्तमात आहे.
आज नात्यांमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी गैरसमज टाळा. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकतात.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज चन्द्र षष्ठ स्थानी आहे.
घर आणि काम यामध्ये संतुलन साधावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज चन्द्र पंचमात आहे.
प्रेम आणि आनंदासाठी उत्तम दिवस. सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. स्वतःची आवड जोपासा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज चन्द्र चतुर्थ स्थानी आहे.
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आई किंवा घरातील महिलांसोबत मतभेद होऊ शकतात. शांतपणे संवाद साधा. घर सजावट किंवा बदल करण्याची इच्छा होईल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज चन्द्र पराक्रम स्थानी आहे.
आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. बोलण्याच्या शैलीमुळे लोक प्रभावित होतील. छोट्या प्रवासाचा योग आहे. मैत्रिणींसोबत वेळ छान जाईल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज चन्द्र धनस्थानी आहे.
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. काम करणाऱ्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी आहे.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज चन्द्र तुमच्या च राशीत आहे.
आज तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असाल. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. पण भावनिक चढउतार होऊ शकतात. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला प्राधान्य द्या.खर्च वाढेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज चन्द्र व्यय स्थानी आहे.
मनात अस्वस्थता आणि गोंधळ राहू शकतो. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि प्रार्थना केल्यास मानसिक शांती मिळेल.
♐ धनु
मैत्रीणींनो आज चन्द्र लाभात आहे.
मित्र-मैत्रिणींचा उत्तम सहवास लाभेल. नवीन संपर्क भविष्यात उपयोगी पडतील. एखादे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकाल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज चन्द्र दशमात आहे.
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही सक्षमपणे निभवाल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज चन्द्र भाग्यात आहे.
नशीब साथ देईल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा योग आहे. आत्मविश्वासाने पुढे जा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज चन्द्र अष्टमात आहे.
भावनिक आणि आर्थिक बाबतीत सावध रहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःची काळजी घ्या आणि विश्रांती घ्या.
✨ आजचा महिलांसाठी उपाय:
पांढरे किंवा गुलाबी कपडे परिधान करा
सुगंध (परफ्यूम/अत्तर) वापरा – शुक्र प्रसन्न राहतो श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क .