लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार.
रविवार, *29 मार्च 2026*. चैत्र शुक्ल एकादशी,*कामदा एकादशी*
घबाड सकाळी 7:47 नंतर दुपारी 2:38 पर्यन्त
राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज चांगला दिवस .
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क/दुपारी 2:38 नंतर सिंह(विष्टि करण शांती)
*29* मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि चंद्राचा प्रभाव आहे. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचा राग तुमच्या आटोक्यात येतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी सावधतेने वागतात ..प्रेमाच्या बाबतीत प्रचलित रूढी मोडण्यास तयार असतात. घराबद्दल ओढा असून सर्व सुख सोयींकडे बारीक काही नाही लक्ष देतात. इतरांना समजून घेण्याची तुमची सहज प्रवृत्ती आहे त्यामुळे सर्वत्र तुमच्या स्वागत होते .इतरांना मदत करण्यापूर्वी विचारपूर्वक वागावे घाईने निर्णय घेऊ नये. तुम्ही अतिशय प्रेमळ आपुलकी दाखवणाऱ्या व निष्ठावान आहात .तुम्ही लहरी आणि प्रतिष्ठा जपणाऱ्या असता. दिमाख व वैभवशाली जीवनाकडे ओढ असते .बाग बगीचा व पाळीव जनावरांची आवड असते .घरात आनंद व शांतता ठेवण्याची तुमची वृत्ती असते .आपल्या पतीला सर्व प्रकारे साथ देण्यात तुम्ही वाकबगार असता. उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या चांगली कल्पनाशक्ती आहे. तुम्ही इतरांचे ऐकून घेतात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे करतात. इतरांच्या भावनांची तुम्ही कदर करतात. चांगले आणि वाईट यात तुम्ही फरक करू शकतात. तुमचे ध्येय काय आहे याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असते. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. कामात टापटीप असते. दूरच्या प्रवासाची आवड असते. तुम्ही इतरांना सहजपणे आकर्षित करतात. धर्मबद्दल ओढ आहे मात्र कर्मकांडवर विश्वास नाही. निसर्गाबद्दल प्रेम आहे. समुद्र आणि खगोल यांची आवड असते. वयाच्या 29 नंतर उत्कर्ष होतो. इतरांना मदत करणे आवडते. सहानुभूती वाटते. मोठमोठे प्रकल्प हाती घेऊन तुम्ही ते पूर्णत्वास नेतात.
शुभ रंग – पांढरा, बदामी, जांभळा.
शुभ वार-सोमवार, गुरुवार शुक्रवार,
शुभ रत्न- मोती,हिरा
*आजचे राशिभविष्य*
♈ मेष
मैत्रीणींनो आज चतुर्थ आणि पंचम स्थानातून चन्द्र गोचर करेल.
सकाळी घरगुती कामात व्यस्त राहाल,सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. पण दुपारनंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा लोकांमध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल.रोमॅंटिक संध्याकाळ अनुभवाल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज तृतीय आणि चतुर्थ स्थानातून चन्द्र गोचर करेल.
संवादातून फायदा होईल.दुपारनंतर एखादी चांगली बातमी मिळू शकते. भावंडांशी संबंध सुधारतील.संध्याकाळ नवीन खरेदी ची.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज धन आणि तृतीय स्थानातून चन्द्र गोचर करेल.
आर्थिक बाबतीत सकाळी विचार कराल, दुपारनंतर खर्च वाढू शकतो. स्वतःवर खर्च करण्याचा मोह होईल.छोट्या सहली घडतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज तुमच्याच राशीत आणि धन स्थानातून चन्द्र गोचर करेल.
सकाळपर्यंत तुमचा प्रभाव जास्त राहील. मनातील गोष्टी व्यक्त करण्याची संधी मिळेल. दुपारनंतर आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्या.गायन मनोरंजन क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.अनपेक्षित बातमी कळेल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज व्यय आणि
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने उत्साह आणि आकर्षण वाढेल. नवीन कामाची सुरुवात किंवा स्वतःमध्ये बदल करण्यासाठी योग्य वेळ.स्वतःसाठी खर्च कराल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज लाभ आणि व्यय स्थानी चन्द्र गोचर करेल.
सकाळी मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. इच्छा पूर्ण होतील.दुपारनंतर थोडा एकांत हवा वाटेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.आर्थिक लाभ होतील पण अनपेक्षित खर्च ही होईल.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज दशम आणि लाभ स्थानातून गोचर करेल.
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी आणि नेटवर्किंगसाठी दिवस चांगला आहे.दुपारनंतर मैत्र मंडळी सोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.नवतरुणींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज नवम आणि दशम स्थानातून गोचर करेल.
भाग्य तुमच्या बाजूने आहे. दुपारनंतर कामात प्रगती होईल. पतीकडून कौतुक मिळण्याची शक्यता.महिलांचे सहकार्य मिळेल.
♐ धनु
मैत्रीणींनो आज अष्टम आणि नवम स्थानातून गोचर करेल.सकाळचे सत्र आर्थिक दृष्टीने उत्तम.अचानक लाभ घडेल. दुपारनंतर
प्रवास किंवा नवीन अनुभवांची संधी मिळेल. अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज सप्तम आणि अष्टम स्थानातून गोचर करेल.सकाळ पतीसोबत आनंदी व्यतीत कराल.एखादी सहल घडेल.
आज थोडी चढ-उताराची स्थिती राहील. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार जपून करा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज षष्ठ आणि सप्तम स्थानातून गोचर करेल.
जोडीदार किंवा पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल. दुपारनंतर नातेसंबंध अधिक मजबूत होतील.एखादी भेटवस्तू मिळू शकते.
♓ मीन
मैत्रीणींनो आज पंचम आणि षष्ठ स्थानातून गोचर करेल.सकाळचे सत्र प्रेमीकाना अनुकूल.
कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष श्री निलेश अंबादास देशमुख बेंगलोर
मोबाईल 8180828176
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.