ललातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 25/3/2026गीता सुगीता कर्तव्या
“गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसंग्रहैः । या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता ।।”
श्रीमद्भगवद्गीता सुंदर रीतीने अध्ययन आणि आचरण करण्यासारखी आहे. इतर अनेक ग्रंथांचा संग्रह करून काय करायचे? कारण ती स्वतःच भगवान पद्मनाभ (श्रीविष्णू) यांच्या मुखकमलातून प्रकट झालेली आहे. या श्लोकात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रेष्ठतेचे आणि अनन्यसाधारण महत्त्वाचे वर्णन केले आहे. गीता ही इतर सर्व शास्त्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून उच्चारित झाली आहे. इतर ग्रंथांचा अभ्यास करूनही जे ज्ञान भगवद्गीतेतून मिळते ते वेगळे आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे गीतेचे अध्ययन, आचरण आणि चिंतन करणे इतर कोणत्याही ग्रंथाच्या तुलनेत अधिक महत्त्वाचे आहे, असे या श्लोकातून सुचवले आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏