Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 18/3/2026 गच्छ तात यथासुखम्”रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् । अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम् ।।”बाळा, (लक्ष्मणा) रामालाच दशरथासारखा मान, सीतेला माझ्या जागी समज आणि अरण्य हीच अयोध्या आहे असे मानून तू खुशाल (वनात) जा.ज्येष्ठो भ्राता पितुः समः मोठ्या भावाला पित्याप्रमाणे मानावे व त्याच्या पत्नीचा मातेसारखा आदर करावा. धाकट्या भावाने थोरल्या भाऊ-भावजयीशी कसे वागावे याचा सर्वश्रेष्ठ आदर्श सुमित्रेच्या शब्दांत व्यक्त झालेला आहे. स्वतः च्या पुत्राला हा उपदेश करणारी सुमित्रा, भारतीय संस्कृतीतील आदर्श मातेची मूर्ती आहे. रामाची सावत्र व लक्ष्मणाची प्रत्यक्ष माता आणि दशरथाची पत्नी असे दोन्ही आदर्श सुमित्रेच्या रूपाने येथे साक्षात झालेले आहेत. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏🚩

RELATED ARTICLES

Most Popular