लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
मंगळवार, 17 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण त्रयोदशी, शिवरात्री
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज त्रयोदशी वर्ज्य दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची राशी कुंभ असुन विष्टी करण शांती करून घेणे.
17 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. विचार विधायक असतात.शांतताप्रिय असून लोककल्याणकारी कामे करता. गूढ विद्या, हिप्नॉटीझम या बद्दल आकर्षण असते.धाडसी व गर्विष्ठ असता. संशोधन व ज्ञान या कडे ओढा असतो.काहीवेळ अतिशय उदार स्वभाव तर काही वेळेस अत्यंत कंजूष स्वभाव असतो.स्वतःच्या कल्पनेने, विचाराने यश मिळते.
गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे शनी ग्रहाच्या नैराश्य तुन तुम्ही काही प्रमाणात का होईना दूर जाता. शिस्त, गांभीर्य ,दृढपणा कर्तव्याची जाणीव ही तुमची वैशिष्ट्ये आहे .तुम्ही विचारी व स्थिर वृत्तीचे असतात. कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू तुम्ही जाणून घेता. बऱ्याच वेळा तुम्हाला एकाकीपणा जाणवतो. तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात निसर्ग सौंदर्य व फुले याबद्दल ओढ असते .शास्त्रीय संगीताची आवड असून गंभीर संगीत जास्त आवडते .इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणे व हुशार असतात .महत्त्वाकांक्षी असून सतत कामात व्यस्त राहणे आवडते .तुम्ही कार्यशील कार्यक्षम व अधिकार गाजवणारे असता. गरिबांविषयी आदर आपुलकी असते .जन्मत: उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून काम करून घेणे जमते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी व विलंब याचा जीवनात भरपूर अनुभव येतो .पैशाच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक नियोजन केले जाते .इतर लोकांना ज्यावेळेस मदतीची जरूर असते तेव्हा ते तुमच्याकडे येतात याचे कारण म्हणजे तुम्ही त्यांचे दुःख उत्तम तऱ्हेने समजू शकता .कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणे, त्याचप्रमाणे मुले नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करणे तुम्हाला आवडते .तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असतो. लोकप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते ,पण अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येऊ शकतात.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शनिवार
शुभ रंग – राखाडी गडद निळा किंवा काळा
शुभ रत्ने:- नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे
आज मित्रमैत्रिणी किंवा ओळखीच्या लोकांकडून मदत मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.इच्छा पूर्ण होतील.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज दशमस्थानी चन्द्र आहे
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात.जास्त मेहनत घेतल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे.घाई टाळा.रागावर नियंत्रण ठेवा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज भाग्यस्थानी चन्द्र आहे
आज नवीन ज्ञान किंवा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात.मात्र धावपळ टाळा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज अष्टमस्थानी चन्द्र आहे
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. शांतपणे निर्णय घ्या.वाहन जपून चालवा.बोलण्यातून गैरसमज टाळा.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.विवाह किंवा प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल, पण कधी कधी लहानसहान वाद किंवा मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संयमाने आणि समजूतदारपणे संवाद साधणे आवश्यक आहे.
जोडीदार किंवा सहकाऱ्यांसोबत समजूतदारपणे वागा.बोलण्यात उतावळे पणा असेल ती टाळा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज षष्ठस्थानी चन्द्र आहे.
नोकरी किंवा व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. स्पर्धात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची संधी मिळू शकते. काहींना नवीन जबाबदारी किंवा अतिरिक्त काम मिळू शकते.
कामात धावपळ वाढू शकते. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्याची पथ्ये पाळा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल. मुलांशी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण मिळतील.स्पर्धा परीक्षा किंवा ज्ञानाशी संबंधित कामात फायदा होण्याची शक्यता आहे. कला, लेखन, शिक्षण, मीडिया किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल ठरू शकतो.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.घराशी संबंधित एखादा निर्णय, दुरुस्ती, बदल किंवा खरेदीचा विचार होऊ शकतो. काहींना घर, वाहन किंवा स्थावर मालमत्ता यासंबंधी चर्चा किंवा योजना करण्याचा योग आहे
घरगुती विषयांवर लक्ष राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत शांतपणे चर्चा करा.समजुतीने घेतल्यास दिवस आनंदी जाइल.
♐ धनु
मैत्रीणींनो आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.भाऊ-बहिणी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संपर्क वाढेल. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. छोट्या प्रवासाचे योग देखील संभवतात.
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन ओळखीतून लाभ होइल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.आर्थिक आवक वाढली तरी खर्च ही होईल.
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कठोर बोलणे होईल.वाद टाळा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना किंवा काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग. प्रवास घडेल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल.चिडचिड न करता शांतपणे विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल.
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी अंक ज्योतिष शास्त्रानुसार संपूर्ण माहिती दिली जाते. श्री निलेश अंबादास देशमुख. बेंगलोर.