लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 15/3/2026 लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष. उपाध्यक्ष च्या निवडी बाबत भारतीय जनता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहयोगी पक्ष असे एकुण चौतीस सदस्य आपल्या लातूर नगरी कडे प्रवास सुरू केला.हा प्रवास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी सुरू करण्यासाठी कटिबद्ध झाले असून त्या सर्व बाबतीत राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील जाधव.माजी मंत्री संभाजी पाटील.माजी मंत्री तथा जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर.तसेच उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री श्री संजय बनसोडे यांच्या सर्वांच्या नियोजन तुन अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले असे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळले. परंतु नक्की कोण दावेदार मात्र कळले नाही.आता पर्यंत जिल्हा परिषदेचा कार्यभार प्रशासक यांच्या हस्ते चालला. ह्या पुढील सर्व मिनी मंत्रालय जिल्हा परिषद चा कारभार हा जनतेने निवडून दिलेल्या सभासदा मार्फत चालणार आहे.काय विकास काय कामे आता जनता पाहण्यास उत्सुक आहे.