Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

रविवार, 15 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण एकादशी
पाप मोचनी एकादशी

राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर.परिघ योग शांती करून घेणे.

15 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरू आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. उत्तम वक्तृत्व, स्वतंत्र पणा, हरहुन्नरी पणाही तुमची वैशिष्ट्य आहे .मोठेपणा प्रतिष्ठा व  मान या गोष्टींना तुम्ही अधिक महत्त्व देता. दुसऱ्याची परीक्षा झटकन करण्याचे ज्ञान तुम्हाला उपजत असेल. स्वतःचे गुण दाखवण्यासाठी मात्र संधी चालू मिळावी लागते .जे लोक मनाने भित्रे आहे किंवा अस्वस्थ आहेत, अशांना तुम्ही मदत करू शकता किंवा अशा लोकांशीच तुमचा संबंध येतो .तुमची बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती उत्तम असते. उत्तम सल्लागार, राजदूत ,गव्हर्नर अशा विविध क्षेत्रात तुम्ही जबाबदारीच्या जागा पेलु शकता. गुढ विद्येची आवड असली तरी त्यात सखोल अभ्यास करण्याची वृत्ती नसते. घर ,संसार, मित्रमंडळी यांच्या बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात व त्यात तुम्ही फार गुरफटले जातात.

तुम्ही जन्मतः च कलाकार आणि कलाप्रिय असता.मन विशाल,महत्वाकांक्षी असून दुसर्यांचा आदर करता.प्रसन्न व्यक्तीमत्व असून मोहक व आकर्षक बोलण्याने तुम्हला भेटून इतरांना आनंद होतो.समजूतदार असून आतल्या आवाजाची देणगी असते.स्वतःवर चा दुर्दम्य विश्वास असल्याने स्वतःचे निर्णय स्वतः घेता.संभाषण चातुर्य असते.जीवनात मान व अधिकार मिळतो. एकांत वास प्रिय असतो.आयुष्य आरामदायी व सुखालोलुप नेण्याकडे कल असतो.उच्च प्रतीचे दागदागिने, सुगंधित द्रव्ये याची आवड असते.स्वातंत्रवृत्ती असल्याने कोणाचेही वर्चस्व खपत नाही.पैशाच्या बाबतीत नशीबवान असता.अनपेक्षित पैसा मिळतो.मात्र नियोजन नीट करावे.
उत्तम गृहिणी व गृहकृत्यदक्ष,निष्ठावान, प्रेमळ आई असता.पतीशी जुळवून घेता, त्या बाबतीत हुशार असता.समाजप्रिय असता.आरोग्य सुदृढ असते.

शुभ दिवस:- सोमवार,मंगळवार ,गुरुवार शुक्रवार

शुभ रंग – निळा, गुलाबी ,जांभळा

शुभ रत्ने:-हिरा, पाचू किंवा हिरा
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज दशमस्थानी चन्द्र आहे.
आज कामात प्रगती दिसू शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी दिवस अनुकूल आहे.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज नवमस्थानी चन्द्र आहे.वडिलांचा आशीर्वाद लाभेल.
भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज अष्टमस्थानी चन्द्र आहे.सासुरवाडी कडून लाभ होऊ शकतो.
आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेता येईल.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.
नातेसंबंध आणि भागीदारी यावर लक्ष द्यावे लागेल. संवादातून अनेक प्रश्न सोडवता येतील.जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू।शकते.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज षष्ठस्थानी चन्द्र आहे.
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांकडून किंवा कुटुंबातून आनंदाची बातमी मिळू शकते. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल.शैक्षणिक यश मिळेल.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.घरातल्या इंटेरिअर मध्ये बदल कराल,त्या साठी खर्च होईल.वाहन सौख्य लाभेल.
घरगुती कामात व्यस्त रहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळेल.कलागुण दिसून येतील.

♐ धनु

मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल.कलाकारांना नवीन संधी येतील. बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.चैनीसाठी खर्च कराल.कामाचा झपाटा राहील.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज व्ययस्थानी चन्द्र आहे.
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. शांतपणे विचार करण्यासाठी वेळ मिळेल. आर्थिक लाभ होतील.परदेशातुन संपर्क तुन लाभ होऊ शकतो.

♓ मीन

मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.मस्त सवंगड्या सोबत सहल घडेल.मौजमजा कराल.विवाह इच्छुकांना शुभ बातमी मिळु शकते.
मित्रमैत्रिणी किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. सामाजिक संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात.

कुंडली.गुण मिलन सर्व अंक ज्योतिष शास्त्रानुसार संपूर्ण माहिती दिली जाते. संपर्क.श्री निलेश अंबादास देशमुख.बैग॔लोर मोबाईल नंबर.9561796324.

RELATED ARTICLES

Most Popular