लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 14/3/2026 क्षणशः कणशश्चैव
“क्षणश: कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्। क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ॥”
विद्या आणि संपत्ती हळूहळू क्षणाक्षणाने आणि कणाकणाने मिळवावी. कारण क्षणाचा त्याग केल्यास विद्या मिळणार नाही आणि कणांचा त्याग केल्यास संपत्ती मिळणार नाही. या श्लोकात संयम, सातत्य आणि परिश्रमाचे महत्त्व सांगितले आहे. विद्या आणि संपत्ती या तात्काळ मिळणाऱ्या गोष्टी नाहीत; त्या हळूहळू आणि सततच्या प्रयत्नांमुळेच मिळतात. वेळ आणि छोट्या-छोट्या गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास मोठे ध्येय साध्य करता येते. श्लोकातून वेळेचा आदर आणि प्रयत्नांचे सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर..