लातुर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 12/3/2026
कोऽहं कस्त्वं कुत आयातः”कस्त्वं कोऽहं कुत आयातः का मे जननी को मे तातः । इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्या स्वप्नविचारम् ॥”तू कोण, मी कोण, कोठुन आलो. माझी आई कोण आहे आणि वडील म्हणजे कोण याच्या (सूक्ष्म विचाराने) सर्व जग मिथ्या आहे. स्वप्नासारखे क्षणभंगुर आहे, असे निश्चयाने जाणून घे. या श्लोकात जगाच्या तात्पुरतेपणाचे आणि आत्मचिंतनाचे महत्त्व सांगितले आहे. जगातील गोष्टी क्षणभंगुर आहेत आणि स्वप्नासारख्या असतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये अडकून न राहता, माणसाने स्वतःचा शोध घ्यावा आणि आत्मज्ञान प्राप्त करावे. जगाच्या असारतेचा विचार करून, परमार्थाच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व येथे सांगितले आहे.अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🌹