Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

मंगळवार, 10 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण सप्तमी

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

आज भद्रा वर्ज्य दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची वृश्चिक रास असून विष्टि करण,हर्षण योग शांती करून घेणे.

10 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि गुरू ग्रहांचे वर्चस्व आहे.
अतिशय व्यवहारिक असल्याने तुमचा सल्ला ही व्यवहारिक असतो.जबाबदारी च्या जागा सांभाळू शकता. कायदा पाळता. वागण्यात मात्र दुटप्पीपणा जाणवतो, प्रत्यक्षात कसे वागाल ते त्या वेळच्या परिस्थिती वर अवलंबून असते. नातेवाईकांच्या उदा. आई,वडील,सासुसासरे ह्यापासून आर्थिक लाभ होतो.वयाच्या 46 वर्षानंतर भाग्योदय होतो.इतरांना तुमच्या पासून खूप लाभ होतो पण त्याचे श्रेय मात्र तुम्हाला मिळत नाही.घराचा फारसा ओढा नसतो.नोकरी/व्यवसायात चांगले यश मिळते.
मानमान्यता ,प्रतिष्ठान या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. महत्त्वकांक्षी असून अनेक गोष्टीत रस असतो. संभाषण कौशल्यामुळे दुसऱ्यावर सहजपणे छाप पडतात .तुम्ही स्वतंत्र विचारांचे वृत्तीचे असतात .कलेबद्दल आकर्षण असून उत्साहाने त्यात भाग घेतात उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते. त्रस्त भूमिकेतून इतरांना उत्तम सल्ला देता. एकाच विषयात फार काळ रमत नाही .मैत्रीमध्ये आणि व्यवसायामध्ये अनेक बदल होतात .मानवी स्वभाव ओळखण्याचे उपजत ज्ञान तुमच्याकडे असते .इच्छाशक्ती दांडी असून कोणताही विषय चांगल्या तऱ्हेने समजून घेता. मैत्रिणी ,नातेवाईकांशी प्रामाणिक राहता .जीवनात शिस्त कडकपणे पाळता. उदार मनाचे असले तरी भविष्यकाळातील गुंतवणूक नियोजन पूर्ण करतात. कोणत्याही प्रकारच्या समाजाचा सहजतेने मिसळतात .तुम्हाला समाजाविषयी कळकळ असून हुशार बुद्धिमान शेजाऱ्यांशी तुमचे जमून शकते. तुमचे जीवन समाधानी व सुखी असेल .इतरांच्या मानाने तुमचे राहणीमान वरच्या दर्जाचे असते. खर्चिकपणा असून घरामध्ये सर्व सुख सोयींनी नाविन्यपूर्ण वस्तू असतात पुस्तकांची ही आवड असते. तुम्हाला आरामशीर जीवनाची आवड असून घराची सजावट खर्चिक पद्धतीने केलेली असते. तुम्ही हुशार व दिसायला चांगले असतात .नृत्य व संगीताची आवड असते पण तिला उत्तम साथ देता .मात्र वैवाहिक साथीदाराची निवड योग्य रीतीने करावी .आपल्या साथीदार आपल्यासारखाच उत्साही ,सौंदर्यप्रेमी ,उत्तम कपड्यांची आवड असलेला, घरात व समाजात मिसळणारा असावा हे पहावे.

शुभरंग – पिवळा, जांभळा
शुभ वार-सोमवार, गुरुवार शुक्रवार,
शुभ रत्न- माणिक आणि पाचू पुष्कराज
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घेणे)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज महिलांना कामात वेग येईल. एखादे अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील महिलांशी प्रेमाने वागा. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
शुभ रंग: पांढरा
उपाय: लक्ष्मीदेवीला सुगंधी फुले अर्पण करा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
आज संवादातून कामे सोपी होतील. नवीन ओळखी किंवा मैत्री लाभदायक ठरू शकते. महिलांना एखादी चांगली बातमी मिळू शकते.
शुभ रंग: हिरवा
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत विचार करून निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील लोकांकडून सहकार्य मिळेल.संतती च्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभ रंग: क्रीम
उपाय: शंकराला दूध अर्पण करा.

♌ सिंह

मैत्रीणींनो
आज आत्मविश्वास वाढेल.प्रवास घडेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.

♍ कन्या

कामाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.दगदग होईल.शत्रूंचा पराभव होईल. विश्रांती घेणे आवश्यक आहे.
शुभ रंग: फिकट हिरवा
उपाय: बुध मंत्राचा जप करा.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
आज मित्रमैत्रिणींचा सहकार्य मिळेल. सामाजिक ,कौटुंबिक कार्यक्रम किंवा नातलगांच्या भेटीगाठी होऊ शकतात. महिलांना आनंददायी अनुभव मिळेल.
शुभ रंग: गुलाबी
उपाय: लक्ष्मीदेवीचे नामस्मरण करा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: मरून
उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज चन्द्र व्यय स्थानी आहे.
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वातावरणात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.क्रोध टाळा.खर्च वाढेल.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरू मंत्राचा जप करा.

♑ मकर

मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.
मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. त्यांच्या साठी खर्च कराल.नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
शुभ रंग: निळा
उपाय: शनीदेवाला तीळ तेलाचा दिवा लावा.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. महिलांनी मेहनत कायम ठेवावी.
शुभ रंग: जांभळा
उपाय: गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

♓ मीन

मैत्रीणींनो
आध्यात्मिक विचार वाढतील. धार्मिक प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. महिलांना मानसिक समाधान मिळेल.
शुभ रंग: आकाशी
उपाय: विष्णू मंदिरात दर्शन घ्या.

कुंडली.गुण मिलन. सर्व बाबतीत योग्य सल्ला मिळेल.

ज्योतिषी . श्री निलेश अंबादास देशमुख. बेंगलोर मोबाईल नंबर.9561796324.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

Most Popular