लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 9/3/2026
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी राज्य आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आजही आपल्या राज्यातील ग्रामीण भागात एका मागासवर्गीय व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत क्लेशदायक आहे.
अनेक गावांमध्ये आजही मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर, त्यांना ‘सार्वजनिक’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला जातो. हा केवळ विरोध नसून संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली आहे.
मी विधान परिषदेत सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे:
✅ अशा घटना घडल्यास संबंधित तहसीलदार, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी.
✅ अंत्यसंस्कार रोखणाऱ्यांवर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अजामीनपात्र अटक करण्यात यावी.
✅ पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण मिळण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करण्यात यावी.