लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर
लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार सोमवार, 9 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण षष्ठी
*संत एकनाथ महा. षष्ठी
राहुकाळ – सकाळी 7:30 ते
आज संध्याकाळी 4 वा नंतर चांगला दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ/सकाळी 9:30 नंतर वृश्चिक(व्यघात योग शांती)
9 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे.
मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आक्रमकता, प्रतिकार, धाडस ,तडफ व तत्परता दाखवते तुम्ही लढाव वृत्तीचे असतात तुम्हाला दुसऱ्याची खोडी काढायला आवडते. कितीही विरोधी परिस्थिती असली तरीही तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहता. पराभव तुम्हाला मान्य नसतो. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. तुमच्या बोलण्यात नाजूकपणा किंवा युक्तिवाद नसतो परंतु तुमचा हेतू मात्र चांगला असतो .काहीही विचार न करता उतावळेपणाने नवीन योजनेत घुसण्याची तुमची वृत्ती असते. तुम्ही तापट व धाडसी असून भावनाशील नसता. तुमची लक्षात येते परंतु तुम्हाला ते मान्य होत नाही. खोटा अभिमान व मानीपणा तुमच्यात असतो .शक्यतो दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळावे .खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते .शूर असल्याने भांडणाची फिकीर करीत नाही .दुबळ्या लोकांबद्दल दया वाटते. तापट असल्या तरीही गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे स्वतःवर ताबा ठेवण्याची क्षमता तुमच्याकडे असते आणि त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. मुले व प्राणी प्रिय असतात. मित्र-मैत्रिणींबद्दल प्रेम असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तुम्ही तयार होतात. विश्वासू व जबाबदारीच्या जागा सांभाळू शकता. महत्त्वकांक्षा, पुढारी पण ,धार्मिक वृत्ती मानमरातब ,निसर्गप्रेम हे गुण विशेषता आढळतात .तुम्ही अभ्यासू व विचारवंत असतात. सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढारलेले असतात ,त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. मात्र मित्र व मैत्रिणी नातेवाईक यांच्याबाबत पैशाची देवाण-घेवाण करताना सारासार विचार जरूर करावा. तुमच्या आवडीनिवडी बाबत तुम्ही ठाम भूमिका घेता. तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत. तुम्ही महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता. पत्नीला त्याच्या कामात साथ देता.
.स्वतःचाही उद्योग धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.विनोदी स्वभाव व संभाषण कौशल्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते.
शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शुक्रवार
शुभ रंग – तांबडा, पांढरा ,पिवळा
शुभ रत्ने:- पुष्कराज, मोती माणिक
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
सकाळी नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर भावना अधिक तीव्र होतील.
घरात एखाद्या विषयावर गंभीर चर्चा होऊ शकते.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
शुक्र–चंद्र प्रभावामुळे प्रेमळ वातावरण राहील. कुटुंबातील महिलांसोबत जवळीक वाढेल.सौंदर्य प्रसाधन,अत्तर याचा वापर कराल.
संयमाने काम केल्यास यश.पतीकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज अकल्पित लाभ घडेल.मुलांच्या कडून आनंदी बातमी मिळेल.हाताखाल चे सहकारी मदत करतील.
बुध–गुरू त्रिकोणामुळे तुमचे विचार स्पष्ट राहतील. महिलांना आज चांगले मार्गदर्शन मिळू शकते.
शिक्षण, लेखन, संवादासाठी चांगला दिवस.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. एखादी जुनी आठवण मनात येऊ शकते.
आई किंवा जवळच्या स्त्रीशी संवाद वाढेल.संतती कडून छान बातमी मिळेल.त्यांच्या आनंदासाठी खर्च कराल।.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज सुंदर लिखाण होईल.घरगुती कारणास्तव खरेदी होईल.सजावटीत बदल कराल.
आज तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. पण दुपारनंतर भावनिक प्रतिक्रिया वाढू शकते.
कामात निर्णय घेताना शांत राहा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज भावंडांकडून छान समाचार मिळेल.छोटे प्रवास होतील. सुरूची पदार्थांचा आस्वाद घ्याल.
कामकाजात जबाबदाऱ्या वाढू शकतात. शनीचा प्रभाव संयम शिकवेल.
थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या.
.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज चन्द्र तुमच्या राशीत आणि धनस्थानी आहे.
आत्मविश्वास वाढेल.आनंदी दिवस राहील. कलाकर चमकतील.कौटुंबिक कारणास्तव खर्च कराल.नातेसंबंधात समजूत वाढेल.छान भोजनाचा लाभ मिळेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज दिवसाची सुरुवात कंटाळवाणी राहिली तरीही
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल.स्वतःसाठी खर्च कराल.
नातेसंबंधातल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा निर्णय होऊ शकतो.तुमची पर्स भरलेली राहील.
♐ धनू
मैत्रीणींनो आज सकाळी
मित्रमैत्रिणींसोबत संवाद आनंद देईल. बुध–गुरू योगामुळे नवीन कल्पना सुचतील.आर्थिक लाभ घडतील.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. शनीचा प्रभाव शिस्त राखायला सांगतो.दुपारनंतर मैत्रिणी मार्फत लाभ घडेल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.संध्याकाळ आनंदाची.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आज प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते.
मनाचा कल अध्यात्माकडे राहील.कामाच्या ठिकाणी महिला सहकार्य करतील.अनपेक्षित लाभ घडेल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज प्रवासात लाभ होईल.शैक्षणिक यश मिळेल.
भावनिक समज वाढेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल.