Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार रविवार, 8 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण पंचमी
रंगपंचमी

राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज दुपारी 2 वा पर्यंत चांगला दिवस,जागतिक महिला दिन
आज जन्मलेल्या बाळाची राशी तुळ.

8 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरू आणि शनि या ग्रहांचा प्रभाव आहे.  

गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे शनी ग्रहाच्या नैराश्य तुन तुम्ही काही प्रमाणात का होईना दूर जाता. शिस्त, गांभीर्य ,दृढपणा कर्तव्याची जाणीव ही तुमची वैशिष्ट्ये आहे .तुम्ही विचारी व स्थिर वृत्तीचे असतात. कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू तुम्ही जाणून घेता. बऱ्याच वेळा तुम्हाला एकाकीपणा जाणवतो. तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात निसर्ग सौंदर्य व फुले याबद्दल ओढ असते .शास्त्रीय संगीताची आवड असून गंभीर संगीत जास्त आवडते .इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणे व हुशार असतात .महत्त्वाकांक्षी असून सतत कामात व्यस्त राहणे आवडते .तुम्ही कार्यशील कार्यक्षम व अधिकार गाजवणारे असता. गरिबांविषयी आदर आपुलकी असते .जन्मता उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून काम करून घेणे जमते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी व विलंब याचा जीवनात भरपूर अनुभव येतो .पैशाच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक नियोजन केले जाते .इतर लोकांना ज्यावेळेस मदतीची जरूर असते तेव्हा ते तुमच्याकडे येतात याचे कारण म्हणजे तुम्ही त्यांचे दुःख उत्तम तऱ्हेने समजू शकता .कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणे, त्याचप्रमाणे मुले नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करणे तुम्हाला आवडते .तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असतो. लोकप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते ,पण अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येऊ शकतात.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शनिवार

शुभ रंग – राखाडी गडद निळा किंवा काळा

शुभ रत्ने:- नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य
🌸 महिलांसाठी सविस्तर राशिभविष्य 🌸

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज नातेसंबंध महत्त्वाचे ठरतील. पती, मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत समतोल राखणे आवश्यक आहे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवले तर दिवस चांगला जाईल.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
कामकाजात स्थिरता राहील. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील. महिलांना सौंदर्य, सजावट याकडे ओढ वाटेल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
संवादातून यश मिळेल.भावंडाशी संपर्क होईल,गप्पा रंगतील. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पना मान्य होऊ शकते. नातेसंबंधात गोडवा वाढेल.गरजू व्यक्तीला मदत करा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
घरगुती वातावरण शांत राहील. आई किंवा कुटुंबातील स्त्रीशी भावनिक जवळीक वाढेल.छान अनुभव येतील.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज बोलण्याचा प्रभाव जास्त असेल. महिलांनी आपले विचार आत्मविश्वासाने मांडावेत.प्रवास घडेल.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज सरकार कडून लाभ होईल.सामजिक।मानसन्मान मिळेल.वाहन सौख्याचा.
आर्थिक बाबींमध्ये सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. महिलांना सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात मान मिळेल.प्रवास घडेल.नवीन गॅझेट खरेदि होईल.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. शांतता व ध्यान तुमच्यासाठी लाभदायक.खर्चिक दिवस.महत्वाची कामे पुढे ढकला.

♐ धनू

मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींचा सहवास आनंद देईल. महिलांना नवीन संधी मिळू शकते.संवाद कौशल्य लाभदायक ठरेल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. संयम आणि शिस्त ठेवणे आवश्यक.कामाचे कौतुक होईल.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. महिलांना प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकते.कायदे पाळा.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
भावनिक समज वाढेल.प्रवास कार्यसाधक होतील.मनावर ताबा ठेवा. नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी दिवस चांगला.आरोग्य सांभाळा.

RELATED ARTICLES

Most Popular