लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर युक्तजीवनस्य योगफलम्
“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा॥”
या श्लोकात जीवनातील संतुलनाचे महत्त्व सांगितले आहे. जो मनुष्य आहार-विहारात मितव्ययी आणि संयमी आहे, कर्म करताना अतिरेक करत नाही, तसेच झोप आणि जागरण यातही योग्य प्रमाण पाळतो—त्याच्यासाठी योग दुःखनाशक ठरतो. म्हणजेच योग हा केवळ ध्यान किंवा आसन नसून जीवनशैलीतील संतुलन आहे. अति खाणे, अति उपवास, अति काम किंवा अति झोप—हे सर्व मन आणि शरीर असंतुलित करतात. पण मध्यम मार्ग, मितव्यय आणि शिस्त पाळल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात, आणि दुःख कमी होते.
दाते पंचांग.