लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026. फाल्गुन शुक्ल द्वितीया
.
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
शिवजयंती(तारखे नुसार)
आज उत्तम दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ/दुपारी 3 नंतर मीन आहे.
19 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी ,शनि आणि चंद्र ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुमचा जन्म चांगल्या व श्रीमंत घराण्यात झालेला असतो.इतरांना ज्या सोयी फार उशिरा उपलब्ध होतात त्या सुख सोयी तुम्हाला लहानपणीच मिळतात. काही प्रमाणात एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे हुशार असूनही शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते किंवा व्यत्यय येतो तुम्ही अनेक विषयात रस घेता. खेळ ,संगीत, वाचन हे तुमचे आवडीचे छंद आहेत .शनीच्या प्रभावामुळे काही प्रमाणात तत्त्वज्ञान व गंभीर विषयांची आवड पण असते. संशोधन करण्याची वृत्ती असून त्यात पद्धतशीरपणा व व्यवस्थितपणा असतो.१९ तारखेतील नऊ हा आकडा मंगळाच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे तापट स्वभाव व हेकटपणा ही तुमची गुणवैशिष्ट्ये असतात, भांडणाचे प्रसंग निर्माण होतात .भावनाप्रधान असल्याने प्रेम प्रकरणात झटपट प्रतिसादाची इच्छा करता. बऱ्याच वेळा तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते .तुमच्या हट्टीपणामुळे इतरांबरोबर सहकार्य करणे कठीण जाते. तुमची वृत्ती निर्भय आहे .सतत कामात राहिल्यास सच तुम्ही विचाराने स्थिर होऊ शकतात अन्यथा प्रचंड प्रमाणात मानसिक अस्वस्थता निर्माण होते तुम्हाला आरामशीर जीवन आवडते. आपले घर आश्रस्थान असावे असे वाटते त्यामुळे येणारे जाण्याची जाणारे लोक भरपूर असतात. तुम्ही बुद्धिमान कार्यक्षम व घर कामात कुशल असतात. तुमच्या तुमच्या पतीला तुम्ही योग्य ती साथ देता. तुम्ही निष्ठावान व दयाळू आहात .कौटुंबिक परिस्थितीशी जुळवून घेता .नृत्य व संगीत यांचे शौकीन असता. मात्र तुम्ही वैवाहिक साथीदाराची निवड योग्य रीतीने केली पाहिजे . आपला जोडीदार हा आपल्यासारखाच उत्साही, सौंदर्यप्रेमी ,कपड्यांची आवड असलेला घरात व समाजात मिसळण्याची आवड असलेला असा निवडावा. प्रवासाची आवड ,बुद्धिमत्ता चपळता, प्रामाणिकपणा, कल्पनाशक्ती असलेल्या मित्र-मैत्रिणींकडे तुमचा ओढा असतो.
शुभरंग – नारिंगी, जांभळा,करडा
शुभ वार-रविवार, बुधवार, गुरुवार, शनिवार
शुभ रत्न- माणिक,हिरा,पुष्कराज,👌
अमेस्थिस्ट(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज संयम ठेवल्यास मोठे यश मिळेल. दुपारनंतर अचानक आनंदाची बातमी येऊ शकते.एखादा अनपेक्षित अनुभव येऊ शकतो.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज महत्वाची कामे दुपारनंतर करा.
आर्थिक स्थैर्य वाढेल. घरात समाधान आणि शांतता नांदेल.मनोरंजनात मन रमेल.खरेदी होईल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. बोलण्यातून कामे साध्य होतील.महत्वाची कामे मार्गी लागतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
मन शांत राहील. भावनिक आधार मिळेल. अध्यात्मिक उन्नती साठी चांगला.स्त्रियांसाठी सुखद दिवस.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज प्रतिष्ठा वाढेल. कामात अचानक संधी मिळू शकते.मेहनत जास्त करावी लागेल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
कामात यश, आरोग्य चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी जोडीदाराशी बद्दल चांगली बातमी कळेल.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज संतती सौख्य लाभेल.
नातेसंबंधात गोडवा वाढेल. प्रेमात आनंद मिळेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज कामातल्या
अडचणी दूर होतील. मन आनंदी राहील.दुपारनंतर अकल्पित लाभ होतील.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
भाग्याची दारे उघडतील. प्रवास किंवा नवीन संधी संभवते.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल. पती तुमच्यावर खुश असतील.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
दुपारपर्यंत तणाव राहील, पण नंतर मोठा लाभ
नवीन कल्पना यशस्वी ठरतील.संध्याकाळी आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्याल.इतरांवर प्रभाव राहील.
♓ मीन
मैत्रीणींनो आज सकाळ जरी कंटाळवाणी असली तरी दुपारनंतर तुमच्याच राशीत चन्द्र येईल.आत्मविश्वास वाढेल.
दुपारनंतर चा काळ अतिशय शुभ
मनःशांती, प्रेमात सुख,अचानक आर्थिक लाभ संभवतो.