Homeईपेपरदेवगिरी येथे बैठक संपन्न. कृषी मंत्री. दत्तात्रय भरणे.

देवगिरी येथे बैठक संपन्न. कृषी मंत्री. दत्तात्रय भरणे.

📍देवगिरी | दि. 16 फेब्रुवारी 2026

मुंबई येथे आज पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. मा.उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात देवगिरी या शासकीय निवासस्थानी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले आणि आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीबाबत सखोल चर्चा झाली.

बैठकीदरम्यान जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, विकासकामांचा वेग, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्याबाबत स्पष्ट दिशा देण्यात आल्या. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस नियोजन करताना प्रत्येक भागातील स्थानिक गरजा लक्षात घेऊन काम करण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात पक्ष अधिक संघटित, सक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल, असा विश्वास उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. आगामी काळात शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

ही बैठक प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरली. नव्या उर्जेसह, नव्या संकल्पांसह जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात दृढ झाली.


दत्तात्रय भरणे,
कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES

Most Popular