महिलांसाठी ज्योतिष: लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
सोमवार, 2 फेब्रुवारी 2026.
माघ कृष्ण प्रतिपदा
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
आज चांगला दिवस. गुरुप्रतिपदा
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क/रात्री 10:48 नंतर सिंह
2 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि आणि चंद्र ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुम्ही ध्येय वादी असून तुमच्या प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे .तुमच्या स्वभाव स्वप्नाळू आहे. इतरांनी तयार केलेल्या कामाचे तुम्ही प्रत्यक्ष रूपांतर करू शकता.. तुम्ही योग्य तऱ्हेने विचार करणारे निस्वार्थी व विचारवंत असून दुसऱ्यांच्या भावनांची कदर असते. उत्तम सहचारी व सहकारी म्हणून तुम्ही गौरवले जातात. चांगले किंवा वाईट जाणण्याची निसर्गतः क्षमता असते. कोणत्याही कामातील सर्व बारीक-सारी गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात उतरवता. व्यवस्थितपण, टापटीप हे गुण असून शिस्तबद्ध योजना अस्तित्वात आणता. तुम्ही स्वतःच्या कल्पनेत सतत दंग असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनाचा अभाव असतो. बराच वेळा समाजापासून एकटे राहण्यात स्वतःचे स्वप्न रंगवण्यात तुम्हाला आनंद वाटतो .तुमच्या इतकी कल्पनाशक्ती दुसऱ्या कोणातही क्वचित आढळते. निसर्ग सौंदर्य, समुद्र ,फुले आकाशात यांच्याशी एकरूप होणे तुम्हाला प्रिय असते. तुमच्या स्वभाव अस्थिर, चंचल असून जीवनात सतत बदल झालेला आवडतो. प्रवासाची आवड असून लांबचे प्रवास अधिक सुखकारक वाटतात. दुसऱ्याला आकर्षण घेण्याची एक सुप्त संमोहन शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे असून इतरांची ढवळाढवळ आवडत नाही. कौटुंबिक जीवनात तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला शारीरिक कष्टाची फारशी आवड नसते. तुम्ही प्रेमळ, आपुलकी दाखवणाऱ्या व निष्ठावान आहात. पतीकडून मिळालेल्या सुखसोयीत तुम्ही समाधानी असतात. तुमच्याकडे लहरीपणा आहे. वैभवशाली जीवनाची तुम्हाला ओढ असते. घरात आनंद व शांतता ठेवण्याकडे तुमची वृत्ती असते. उत्तम कल्पनाशक्ती, वाङ्मयीन कृतीशीलता ,भाषाप्रभुत्व आहे शिवाय जे लोक बुद्धिमान असून प्रवासाची आवड आहे अशा बद्दल तुम्हाला ओढ असते.
शुभरंग – पांढरा, जांभळा
शुभ वार-सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार
शुभ रत्न- मोती,हिरा,पुष्कराज(कुंडली नीट तपासुन रत्ने वापरावी)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज चतुर्थ आणि पंचम स्थानी चन्द्र आहे.
आज मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष जाणवू शकतो. घरातील महिलांना जबाबदाऱ्या वाढलेल्या वाटतील. ऑफिसमध्ये बोलताना थोडी चूक होऊ शकते. रात्रीनंतर आत्मविश्वास वाढेल.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमानाला गूळ-चणे अर्पण करा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज तृतीय आणि चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
कुटुंबातील विषय मनाला लागून राहतील. पैशांबाबत भावनेतून निर्णय घेऊ नका.वाहन दुरुस्ती संभवते. महिलांसाठी आज घर आणि स्वतःच्या गरजा यांचा समतोल साधण्याचा दिवस.
शुभ रंग: हिरवा
उपाय: देवी लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज द्वितीयात आणि तृतीय स्थानी चन्द्र आहे.
बुध प्रति-युतीमुळे संवादात गैरसमज संभवतात. महिलांनी आज शब्द जपून वापरावेत. लेखन, अभ्यासासाठी दिवस ठीक.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज तुमच्या च राशीत आणि धन स्थानी चन्द्र आहे.
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. अचानक धनलाभ होईल.बौद्धिक सामर्थ्य अनुभवास येईल. रात्रीनंतर आत्मबल वाढेल.
शुभ रंग: शुभ्र पांढरा
उपाय: शंकराला दूध अर्पण करा.
♌ सिंह
मैत्रीणींनो व्यय स्थानी आणि
रात्री १०:४८ नंतर चंद्र तुमच्याच राशीत असेल
खर्चिक दिवस.जोडीदारासाठी खरेदी कराल.
स्वाभिमान, आत्मविश्वास, आकर्षण वाढेल. महिलांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा उत्तम काळ.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज लाभ आणि व्यय स्थानी चन्द्र आहे.
कामात अचानक बदल होतील. हर्शल योगामुळे नवीन कल्पना सुचतील, पण ताणही वाढेल.खर्च ही वाढतील.
शुभ रंग: फिकट हिरवा
उपाय: विष्णु सहस्रनाम वाचा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज दशम आणि लाभ स्थानी चन्द्र आहे.
शुक्र प्रति-युतीमुळे नातेसंबंधात गोंधळ. महिलांनी अपेक्षा स्पष्ट ठेवाव्यात. सौंदर्य, कला याकडे ओढ राहील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.
शुभ रंग: लाल
उपाय: देवी महालक्ष्मीची पूजा करा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज भाग्य आणि दशम स्थानी चन्द्र आहे.कामाचा तणाव राहील.
मनात साठवलेल्या भावना बाहेर येतील. थोडा राग किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ध्यान, प्रार्थना उपयोगी.
शुभ रंग: जांभळा
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
♐ धनू
मैत्रीणींनो आज अष्टम आणि भाग्य स्थानी चन्द्र आहे.
घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील. महिलांसाठी आई-मुलगी, सासू-सून संवाद वाढेल. निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ रंग: पिवळसर
उपाय: गुरू उपसना करा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज सप्तम आणि अष्टम स्थानी चन्द्र आहे.
करिअरमध्ये अचानक बदल किंवा नवीन जबाबदारी येऊ शकते. महिलांनी लवचिक राहावे.वाहन जपून चालवा.
शुभ रंग: निळा
उपाय: शनिदेवाला तीळ अर्पण करा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज षष्ठ स्थानी आणि सप्तमस्थानी चन्द्र आहे.
चंद्र केंद्र हर्शल—अचानक नवीन संधी येतील, वेगळे विचार, टेक्नॉलॉजी/क्रिएटिव्ह कामासाठी उत्तम दिवस.
शुभ रंग: आकाशी
उपाय: गरजू व्यक्तीस मदत करा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज पंचम आणि षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
मनावर बुध-शुक्रचा प्रभाव राहील, स्वप्नाळूपणा वाढेल. महिलांनी वास्तवाशी जोड ठेवणे गरजेचे.
शुभ रंग: समुद्री हिरवा
उपाय: श्रीकृष्णाची पूजा करा.