लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख वार सोमवार, 19 जानेवारी 2026. माघ शुक्ल प्रतिपदा
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
“आज उत्तम दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर आहे.
(वज्र्य योग, किंस्तुघन करण)
19 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुमच्या भरपूर उत्साह व चपळता आहे. तुमच्या रवी शनी ,मंगळ या तीन ग्रहांचा अंमल आहे. कोणत्याही विषय ठराविक पद्धतीने हाताळायला आवडते. शास्त्रीय पद्धतीची विचारसरणी असते .स्वतःचे निर्णय चटकन घेता .स्वतःच्या कामात मग्न राहणे आवडते. निर निराळ्या खेळांची आवड असते .घोडदौड, नेमबाजी, मैदानी खेळ अधिक आवडतात. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात .दुसऱ्यांच्या गुपित गोष्टींचा स्फोट करीत नसल्यामुळे इतर लोकांची
गुपिते तुमच्या जवळच राहतात. यश प्रामाणिकपणा आणि सुख याची 19 ही तारीख आहे. कधी कधी तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते
तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे इतरांचे सहकार्य मिळवणे कठीण जाते. छोट्या छोट्या गोष्टीची तुम्ही दखल घेता व दुसऱ्यांचे दोष दाखवणे तुम्हाला जास्त आवडते .वक्तृत्व पेक्षा लेखनातून तुम्ही तुमचे विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकता . कल्पकता ,चपळता ,उत्साह कला व हुशारी हे तुमचे खास गुण आहेत. तुमचे व्यक्तिमत्व उत्स्फूर्त असून निसर्गाशी एकरूप होणार होता. जीवनातील आनंद उपभो गण्याची आवड आहे.तुम्हाला शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही काहीसे साशंकवृत्तीची असून होणाऱ्या परिणामांची खात्री नसल्यामुळे निर्णय काहीसे उशिरा घेता .स्वतःच्या चपलतेमुळे जीवनात यशस्वी होतात .समाजातल्या कोणत्याही थरात तुम्ही सहजरीत्या वावरता. तुमचे सामाजिक क्षेत्र विस्तृत असले तरी शनी ग्रहामुळे तुम्हाला एकटेपण जाणवत असते. आणि हे हा एकटेपणा तुमच्या जवळचे मित्र नातेवाईक सुद्धा ओळखू शकत नाहीत. निसर्गतः तुम्ही कलाकार असून हरहुन्नरी असतात .स्वयंभू अंतः स्फूर्ती मुळे तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुमच्या हुशारीचा इतरांवर प्रभाव पडतो .या गुणांमुळे सभास संमेलनने तुम्ही गाजवू शकता. तुमच्या जवळ इच्छाशक्ती आहे व विचारात कृतीत पूर्णपणे स्वतंत्रता आहे. एखाद्या गोष्टीचे नेतृत्व मिळत असेल तरच तुम्ही त्या गोष्टीत रस घेता .तुमची शेजारी जर बुद्धिमान व हुशार असतील आणि ते तुमच्या कामकाजात ढवळाढवळ करत नसतील तर त्यांच्याशी तुमचे पटते एरवी पटत नाही .बऱ्याच वेळा घरातील व कौटुंबिक नातेवाईकांमुळे त्रास होतो. किंवा दुर्दैवी आजारी माणसांना सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर पडते .काही वेळा अतिशय व्यवहारी काही वेळा अति ध्येयवादी अशा दोन्ही स्वभावाचा अनुभव येतो. कधी कधी तुम्ही दुराग्रही व स्वार्थी सुद्धा होता .इतरांपेक्षा तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास जास्त असल्यामुळे दुसऱ्यांच्या मनातले तुम्हाला पटकन जाणता येते .तुम्ही सतत उत्साही व तरुण राहता.
शुभ दिवस:रविवार, बुधवार, गुरुवार
शुभ रंग: सोनेरी, पिवळा, गर्द जांभळा
शुभ रत्न:माणिक, पन्ना, चंद्र मणी
आजचे राशिभविष्य
आज मकर राशीत चंद्र आहे.एकूण 5 ग्रह आज मकर राशीत असल्याने पंचग्रही योग आहे.
रवी,बुध, चन्द्र ,मंगळ,शुक्र
मकर राशीत
♈ मेष
मैत्रीणींनो आज दशमस्थानी चन्द्र आहे.
आज थोडे गंभीर रहाल. घर-काम आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. जोडीदाराशी किंवा कुटुंबातील स्त्री व्यक्तीशी मनमोकळा संवाद ठेवा. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
शुभ रंग: गुलाबी
उपाय: देवीला फुल अर्पण करा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज भाग्यस्थानी चन्द्र आहे.
आज भाग्याची साथ मिळेल. महिलांना शिक्षण, प्रवास, नवीन कल्पना यामध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल.
शुभ रंग: क्रीम
उपाय: गुरुवारी वापरण्याचा पिवळा रुमाल आज वापरा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज अष्टमस्थानी चन्द्र आहे.
आज मनात असुरक्षितता जाणवू शकते. आर्थिक व्यवहारात सावध राहा. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. ध्यान, प्राणायाम उपयुक्त ठरेल.वाहन जपून चालवा.
शुभ रंग: जांभळा
उपाय: “ॐ नमः शिवाय” जप करा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.रोमँटिक दिवस अनुभवायला येईल.
आज नात्यांचा दिवस आहे. पती/सहकारी/मैत्रिणीसोबत भावनिक चर्चा होईल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो.
शुभ रंग: पांढरा
उपाय: पाण्यात साखर घालून सूर्याला अर्घ्य द्या.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज षष्ठस्थानी चन्द्र आहे.महिला सहकारी सहकार्य करतील.त्यांच्या मार्फत लाभ घडेल.
कामाचा ताण वाढेल, पण बुध-शनी योगामुळे महिलांना संयम आणि शहाणपणाने यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ रंग: नेव्ही ब्लू
उपाय: हनुमान चालिसा वाचा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांशी, प्रिय व्यक्तीशी भावनिक नाते घट्ट होईल.बोलण्यातून, प्रवासातून अनपेक्षित लाभ होतील. महिलांसाठी कला, लेखन, डिझाईनमध्ये चांगला दिवस.
शुभ रंग: हिरवा
उपाय: तुळशीला पाणी घाला.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.
घर, कुटुंब, आईशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील.घरातल्या सजावटीसाठी खर्च कराल.बागकामाचा आनंद घ्याल. भावनिक चढ-उतार जाणवू शकतात. संयम ठेवल्यास दिवस सकारात्मक जाईल.
शुभ रंग: पीच
उपाय: घरात सुगंधी अगरबत्ती लावा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.
आज महिलांची संवादशक्ती वाढेल. भावंडे, शेजारी यांच्याशी चर्चा होईल. गुप्त प्रेम किंवा आकर्षण वाढण्याची शक्यता.अचानक शुभ समाचार मिळू शकतो.
शुभ रंग: मरून
उपाय: काळ्या तिळाचे दान करा.
♐ धनु
मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत लाभ होईल, पण खर्चही वाढेल.कौटुंबिक कारणास्तव खर्च कराल.गायक,वक्तृत्व क्षेत्रात उत्तम यश मिळेल. आत्ममूल्याची जाणीव होईल. सौंदर्य, दागिने, कपडे खरेदीसाठी दिवस चांगला.
शुभ रंग: सोनेरी
उपाय: लक्ष्मी स्तोत्र वाचा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल . महिलांना स्वतःबद्दल नवीन निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. मोठे आर्थिक बदल घडतील.प्रगती होईल.व्यक्तिमत्त्वात बदल जाणवेल.कणखरपणा दाखवाल. स्वतःसाठी खर्च कराल.
शुभ रंग: तपकिरी
उपाय: आरशासमोर सकारात्मक विधान बोला.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज व्ययस्थानी चन्द्र आहे.आर्थिक लाभ होतील.अचानक प्रवास घडेल.
एकांताची गरज भासेल. जुने विचार, आठवणी मनात येतील. आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम दिवस.
शुभ रंग: जांभळा
उपाय: ध्यान करताना दिवा लावा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.
मित्रमैत्रिणींशी सम्पर्क होईल . सामाजिक कामातून समाधान मिळेल. महिलांना नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
शुभ रंग: आकाशी
उपाय: गरजू महिलेला मदत कर.