Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार रविवार, 18 जानेवारी 2026. पौष अमावस्या, दर्श अमावस्या

राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

“आज अमावस्या वर्ज्य दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास धनू/दुपारी 4:41 नंतर मकर(हर्षण योग, नाग करण, चतुष्पाद करण शांती)

आजचे राशिभविष्य आणि
18 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर मंगळ आणि शनि या ग्रहाचा प्रभाव आहे.
तुमच्या वर मंगळ ग्रहाच्या प्रभावा मुळे जबरदस्त इच्छाशक्ती, करारी पणा, चिकाटी असते.निर्भय व धैर्यवान असता.वडिलोपार्जित संपत्ती त वाटा मिळतो.शिस्तप्रिय असून दुसर्यांना मदत करायला आवडते.कष्टाळू असून योग्य निर्णय घेणार असता. दुसऱ्यावर हुकूमत गाजवणे आवडते.दुसऱ्याच सल्ला आवडत नाही.स्मरणशक्ती उत्तम असते.
आक्रमकता प्रतिष्ठान व धाडस, तडफ तत्परता असते तुम्ही लढवू वृत्ती चे असता. प्रतिकूल परिस्थितीतही तोंड देण्यात समर्थ असता.बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश चांगला असतो .तुमचे जोरदार व जोश पूर्ण वागणे असते. शक्यतो दुसऱ्यावर टीका करू नये शब्द काळजीपूर्वक वापरावे. तुमचा स्वभाव तापट आहे पण धाडसी आहे .तुम्हाला भावनेचा कळवळा येत नाही. उद्धटपणा व जोर सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतो .खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते. शूर असल्याने कोणताही संकटाचे भीती वाटत नाही. मित्र-मैत्रिणीबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने काढण्यास तुम्ही तयार असतात .मुले व प्राणी फार प्रिय असतात. कोणत्याही परिस्थितीत ठाम राहतात. तुमच्या स्वभाव तापट असतो. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढे गेलेले असतात त्यामुळे इतर लोक तुमच्या सल्ला घेतात .मित्रमैत्रीणी किंवा नातेवाईक यांच्या बद्दल पैशाची जबाबदारी घेताना सारासार विचार ठेवणे जरुरीचे आहे. तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत .प्रवास खूप करता.
पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान असता. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. शनी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास अडचणी येतात. महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .विनोदी स्वभाव व संभाषण कौशल्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. स्वतःच्या नोकरी उद्योग करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.
शुभ दिवस – सोमवार,मंगळवार शुक्रवार, गुरुवार.
शुभ रंग – लाल,पांढरा, जांभळा,करडा.
शुभ अंक – 5,8,14,17
शुभ रत्न:- माणिक,पुष्कराज

(कुंडली पासूनच रत्ने वापरावीत)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज आत्मविश्वास जबरदस्त राहील. कामात पुढाकार घ्याल. महत्वाची कामे सकाळीच करून घ्या.मात्र बोलताना थोडी घाई होऊ शकते. महिलांसाठी आज स्वतःचे मत ठामपणे मांडण्याचा दिवस.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमानाला शेंदूर अर्पण करा.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दुपारनंतर खर्च वाढू शकतो. कुटुंबातील महिलांनी शांत राहिल्यास वातावरण सौहार्दपूर्ण राहील.
शुभ रंग: हिरवा
उपाय: लक्ष्मी मंत्राचा जप करा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
बुध–मंगळ योगामुळे बुद्धी आणि बोलण्याची धार वाढेल. लेखन, बोलणे, शिकवणे यासाठी उत्तम दिवस. मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
रवी–चंद्र युतीमुळे भावनिक चढ-उतार जाणवतील. महिलांनी आज स्वतःच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे. संध्याकाळनंतर मन स्थिर होईल.
शुभ रंग: पांढरा
उपाय: साखर यथाशक्ती दान करणे.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज मानसन्मान, प्रसिद्धी मिळण्याची शक्यता. नेतृत्वगुण दिसून येतील. मात्र अहंकार टाळा. महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारा दिवस.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
कामात अचूकता आणि मेहनत लागेल. बुध–मंगळ योगामुळे कामाचा ताण वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.संध्याकाळ खर्चिक.एखादी छान बातमी मिळेल.
शुभ रंग: फिकट हिरवा
उपाय: विष्णु सहस्रनाम वाचा.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात स्पष्ट संवाद होईल. दुपारनंतर जबाबदाऱ्या वाढतील. महिलांसाठी आज समतोल साधण्याचा दिवस.वाहन सौख्य लाभेल.
शुभ रंग: किरमिजी
उपाय: देवी महालक्ष्मीची पूजा करा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
चंद्र–मंगळ युतीमुळे रागावर नियंत्रण ठेवा. ध्यान, जप उपयोगी ठरेल.इलेक्ट्रॉनिक वस्तू ची काळजी घ्या.
शुभ रंग: जांभळा
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

♐ धनू

मैत्रीणींनो आज
सकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत आणि दुपारनंतर धनस्थानी असेल.आत्मविश्वास आणि उत्साह जास्त.अनपेक्षित लाभ,प्रवास होतील.लक्ष्मी प्राप्ती चे योग. संध्याकाळनंतर कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरू मंत्राचा जप करा.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
दुपारी ४:४१ नंतर चंद्र तुमच्याच राशीमध्ये येईल.जबाबदारी, शिस्त आणि करिअरवर लक्ष वाढेल. महिलांसाठी कामात प्रगतीचा संकेत.अडचणी दूर होतील.
शुभ रंग: निळा
उपाय: शनिदेवाला तीळ अर्पण करा.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
चंद्र त्रिकोण हर्शलमुळे अचानक संधी, नवीन कल्पना मिळतील. सर्जनशील महिलांसाठी उत्तम दिवस.
शुभ रंग: आकाशी
उपाय: गरजू व्यक्तीस मदत करा.

♓ मीन

मैत्रीणींनो आज चंद्राचा
नेपच्यून लाभ योगामुळे अंतर्ज्ञान वाढेल. अध्यात्म, ध्यान, संगीत याकडे ओढ राहील. भावनिक निर्णय टाळा.
शुभ रंग: समुद्री हिरवा
उपाय: श्रीकृष्णाची पूजा करा.

RELATED ARTICLES

Most Popular