शुक्रवार, 16 जानेवारी 2026. पौष कृष्ण त्रयोदशी
प्रदोष,शिवरात्री
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
“आज त्रयोदशी वर्ज्य दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची रास धनू आहे
आजचे राशिभविष्य आणि
16 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर नेपच्यून आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे. तुमचे व्यक्तीमत्व मूलतः च स्वतंत्र आहे.दूरच्या प्रवासाची आवड असून काहींना काही निमित्ताने परदेशा शी संबंध येतो.चाकोरीबद्ध आयुष्य पसंत नसते.नेपच्यून ग्रह अध्यात्मिक तत्त्वाचा असल्याने उच्च कोटींचा अहंकार वैयक्तिक रित्या जोपासला जातो. पक्ष्यांकडे प्रमाणे सोयीरवृत्ती आवडते .मोठमोठे भविष्यवाणी अध्यात्मवादी यांच्यावर नेपच्यून ग्रहाचे प्राबल्य असू शकते .तुमची वागणूक बऱ्याच वेळा गुढ असते. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्यांच्या मताची उपेक्षा केली जाते पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे .काही वेळा तुम्ही बेफिकीर व उदास वृत्तीचे असता.तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींची निवड करतात. सर्वसाधारण विचारसरणीच्या किंवा सामान्य माणसात मिसळणे तुम्हाला आवडत नाही. आयुष्यात सतत बदल आवडतो पुस्तक वाचनाची आवड असते .स्वतःचे ज्ञान अधिकार याची जाणीव असते. सल्ला विचारल्यास तुम्ही अधिकाऱ्याने व खंबीरपणाने देता .खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. स्वतंत्र बाणा असतो .तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते .स्वभाव आनंदी व उत्साही असतो. आयुष्यात सतत बदल होत असल्याने पैशाची बचत करणे कठीण होते .आवडीची नोकरी मिळाल्यास जीवनात चांगला पैसा मिळवून स्थिरता प्राप्त होते .आराम ,सुख सोयी उपलब्ध होतात पण आर्थिक स्थैर्य फार उशिरा मिळते .तुम्ही अतिशय हुशार आहात परंतु तुमचे वागणे अनाकलनीय असते. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत राहता. मित्र मैत्रिणींसोबत मेजवानी करणे आवडते. तुमच्या पतीने सदैव तुमच्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते खास करून . स्वभावाने नम्र असून एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल परंतु इतरांवर वाईट परिणाम होऊ देत नाहीत. चांगले पत्नी म्हणून तुमचे कौतुक केले जाते.
शुभ दिवस- सोमवार ,बुधवार गुरुवार
शुभ रंग- हिरवा, पिवळा जांभळा
शुभ रत्न – पुष्कराज पाचू,लसण्या(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज घर-काम आणि ऑफिस यांचा समतोल साधावा लागेल. जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. मनात थोडा ताण जाणवेल, पण संध्याकाळपर्यंत गोष्टी निवळतील.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमान चालीसा वाचा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणावरही अति विश्वास नको. भावनिक बाबतीत गैरसमज टाळा.वाहन काळजीपूर्वक चालवा.
शुभ रंग: हिरवा
उपाय: देवी लक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. महिलांसाठी आज स्वतःची भूमिका ठाम ठेवण्याचा दिवस आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
मन संवेदनशील राहील. जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात. ध्यान, प्रार्थना केल्यास मन शांत होईल.
शुभ रंग: पांढरा
उपाय: चिमूटभर साखर मुंग्यांना द्या.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमच्यातील नेतृत्वगुण दिसून येतील. मात्र अहंकार टाळा. स्त्रियांसाठी आज सन्मान वाढवणारा दिवस आहे.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
कामात अचूकता ठेवावी लागेल. छोट्या चुका मोठ्या होऊ शकतात. मानसिक थकवा जाणवू शकतो.
शुभ रंग: फिकट हिरवा
उपाय: विष्णु सहस्रनाम ऐका किंवा वाचा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात स्पष्ट संवाद गरजेचा आहे. आज भावना दडपून न ठेवता योग्य शब्दांत व्यक्त करा.
शुभ रंग: गुलाबी
उपाय: देवी महालक्ष्मीची प्रार्थना करा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आत्मपरीक्षणाचा दिवस. जुन्या निर्णयांचा विचार कराल. महिलांसाठी आज अंतर्गत शक्ती वाढवणारा दिवस आहे.
शुभ रंग: जांभळा
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
♐ धनू
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने भावनिक चढ-उतार संभवतात. आत्मविश्वास ठेवा, निर्णय घाईने नको.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरू मंत्राचा जप करा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ मिळेल. महिलांसाठी करिअरबाबत सकारात्मक संकेत आहेत.
शुभ रंग: निळा
उपाय: शनिदेवाला तीळ अर्पण करा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
कल्पनाशक्ती वाढलेली असेल. कला, लेखन, सर्जनशील कामासाठी उत्तम दिवस. मात्र वास्तवाशी नाते ठेवा.
शुभ रंग: आकाशी
उपाय: गरजू व्यक्तीस मदत करा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
मन द्विधा राहील. कोणाच्याही बोलण्याचा जास्त परिणाम करून घेऊ नका.
शुभ रंग: समुद्री हिरवा
उपाय: विष्णु किंवा कृष्णाची पूजा कर.