लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं शनिवार, 27 डिसेंम्बर 2023.
पौष शुक्ल सप्तमी/अष्टमी
राहू काळ: सकाळी 9 ते 10:30
आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास मीन (व्यतिपात योग, विष्टि करण शांती)
27 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर मंगळ आणि गुरू या ग्रहांचा प्रभाव असल्याने तुम्ही कणखर, लढाऊ, परिस्थितीला यशस्वी तोंड देणारे, आक्रमक असे आहात. तुमचे व्यक्तिमत्त्व विरोधाभसी आहे. आत्मविश्वास दांडगा असून गरिबांना मदत करायला आवडते .अध्यात्मिक वृत्ती प्रगत करून लोकांचे दुःख दूर करावे असे तुम्हाला वाटते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असते. तुम्ही भावनाप्रधान व लहरी असल्यामुळे तुमचे वागणे अनाकलनीय असते .स्वतःच्या विचाराबद्दल दुराग्रही असता. मानपमानाच्या विलक्षण कल्पना असून छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही अस्वस्थ होता. अभ्यासू वृत्तीचे असून दुसऱ्याला शिकवणे आवडते. तुमच्या घमेंडखोर व उद्धट वृत्ती मुळे मैत्रपरिवार छोटा असतो .सामाजिक शिष्टाचारा बद्दल आढयतखोर वृत्ती असल्यामुळे शेजाऱ्यांबरोबर जमणे कठीण जाते. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. अभ्यासू, तत्त्वज्ञानी विचारवंत व्यक्ती बद्दल तुम्हाला जवळीक वाटते.
कोणताही पराभव तुमच्या जिव्हारी लागतो. एक वेळ तुम्ही मृत्यु पत्करतो म्हणाल पण पराभव पचवू शकणार नाही. तुम्ही शीघ्रकोपी असून धाडसी, पराक्रमी, क्रीडाप्रेमी आणि वादविवादात जिंकणारे आहात. तुमच्यात कधीकधी खोटा अभिमान आणि उद्धटपणा दिसून येतो. इतरांवर टीका करणे आणि विनाकारण वाद घालणे टाळले पाहिजे. तुमच्या लैंगिक भावना तीव्र असतात. आजारी लोकांना स्वतःच्या आंतरिक शक्ती ने बरी करण्याची ताकद तुमच्यात असते. तुम्ही ठाम विचारांचे असून प्राणी आणि मुले तुम्हाला प्रिय आहेत. मित्रांसाठी तुम्ही काहीही करू शकतात. तुम्ही विश्वासु असून कायदा पालन करणे तुम्हाला आवडते. मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याबाबत पैशाची जबाबदारी घेताना सारासार विचार ठेवण्याची जरुरी असते. तुमच्या आवडीनिवडी व बाबत तुम्ही ठाम भूमिका घेतात .तुम्ही तुमची तत्त्वे सोडत नाहीत .महत्वाकांक्षा पुढारीपणा ,धार्मिक वृती मानमरातब, निसर्ग प्रेम हे विशेष गुण तुमच्यात आढळतात. पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची योग्यता असल्यामुळे पैशाची आवक चांगले राहते .तुम्ही महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात .स्वतःचा व्यवसाय करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ अंक:- 3, 6, 9.
शुभ रंग:- तांबडा.
शुभ रत्न:-पुष्कराज, माणिक,मोती,गारनेट(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घेणे)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो
आज मन थोडे अस्थिर राहू शकते. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे.
थकवा जाणवू शकतो.
ध्यान, प्रार्थना उपयुक्त ठरेल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
मित्रपरिवारातून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत अचानक लाभ संभवतो. सर्जनशील काम करणाऱ्या महिलांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी.
घरात आनंदाचे वातावरण.
खर्चावर नियंत्रण ठेवा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठ महिलांकडून मार्गदर्शन मिळेल. घर आणि करिअर यामधील समतोल साधावा लागेल.
मनात संभ्रम राहिल.
घाईघाईने निर्णय टाळा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज अध्यात्मिक विचार वाढतील. देवपूजा, मंत्रजप, वाचन यामध्ये मन रमेल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल.
प्रवास कार्यसाधक होतील.
विनाकारण चिंता नको.
♌ सिंह
मैत्रीणींनो
आज जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
नातेसंबंध समजून घेणे गरजेचे. गोष्टी मनात न ठेवता मोकळेपणाने बोला.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
वैवाहिक व कौटुंबिक जीवनावर लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराची साथ मिळेल, पण अपेक्षा कमी ठेवा. भागीदारीत काम करणाऱ्या महिलांसाठी दिवस महत्त्वाचा.
खाण्याची पथ्ये पाळा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
कामाचा ताण जाणवेल, पण परिणाम समाधानकारक मिळतील. घरकाम, ऑफिस आणि स्वतःची काळजी यांचा समतोल साधावा लागेल. अंगदुखी, थकवा. विश्रांती आवश्यक.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
प्रेम, कला, सौंदर्य आणि सर्जनशीलतेला उत्तम साथ मिळेल. मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते.
सकारात्मक विचार असतील. आपल्या आवडी जोपासा.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
घर, आई, स्थावर मालमत्ता यासंबंधी विचार होतील. घरात भावनिक वातावरण राहील. स्थलांतर किंवा बदलाचा विचार पुढे ढकला.
घरातील मोठ्यांचे मत ऐका.
♑ मकर
मैत्रीणींनो आज संवाद महत्त्वाचा आहे. भावंडांशी चर्चा, लेखन, बोलणे यामध्ये यश मिळेल. मात्र गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला.समोरच्या चे ऐकण्याची तयारी ठेवा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत चढउतार संभवतात. गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. आत्ममूल्य आणि आत्मविश्वास वाढेल.
बजेट ठरवून खर्च करा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही अधिक संवेदनशील, करुणामय आणि कल्पक राहाल. स्वतःकडे लक्ष द्या.