लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
मंगळवार,23 डिसेंम्बर 2025. पौष शुक्ल तृतीया/चतुर्थी
विनायकी चतुर्थी(अंगारक योग)
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
“आज उत्तम दिवस”आज जन्मलेल्या बाळाची रास मकर(व्याघात योग)
23 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर हर्षल आणि गुरु ग्रहाचा प्रभाव आहे .
तुम्ही महत्त्वाकांक्षी असतात. कायद्याचे पालन करायला आवडते .तुम्ही शांतता प्रिय आहात .पाण्याजवळ तुमच्या भाग्योदय होतो .तुम्हाला व्यावहारिक व आध्यात्मिक अशा दोन्हींची गोष्टींची जोड मिळते संगीत, वाङ्मय, प्रवासाची आवड असते. तुम्हाला वरिष्ठ लोकांकडून मदत व संरक्षण मिळते. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही प्रिय असता. तुमच्याजवळ चांगली शब्द संपत्ती असल्यामुळे बोलण्यात, लिखाणात, भाषण देण्यात, आणि शिकवण्यात तुम्हाला यश मिळते. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात .तुम्ही बुद्धिमान असून उत्तम व्यापारी आहात. तुमच्यामध्ये धूर्तपणा भरलेला आहे. तुम्ही तुमच्या कामात अतिशय तडफदार आणि जलद आहात. स्पर्धकाचे कच्चे दुवे हेरून त्याला नामोहरम करणे तुम्हाला चांगले जमते. क्रीडा संगीत आणि प्रवास यांचे तुम्हाला आवडत असते. तुम्ही अत्यंत प्रसन्न आणि उत्साही असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुमचं मन विशाल आणि क्षमाशील आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष, रहस्य यांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतात. तुम्हाला अंतस्फूर्तीने पुढील गोष्टी समजतात. पतीला योग्य ती साथ तुम्ही देता. पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे तुमचा कल असतो. तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असून आपला वेळ रिकामपणात घालवता .घरात बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. घरामध्ये टापटीप व व्यवस्थितपणा असावा असे तुम्हाला वाटते परंतु ही कामे तुम्ही दुसऱ्याकडून करून घेण्यात वाकबगार असता .ज्यांना वाचनाची आवड असून वक्तृत्व, ज्ञान ,वैचारिक बैठक आहे अशा लोकांमध्ये जाणे आवडते. तसेच अधिकार, प्रतिष्ठा, महत्त्वाकांक्षा आहेत अशांकडे तुमचा ओढा असतो .पैशाच्या बाबतीत काहीसे निष्काळाची असल्याने पैशाची साठवण साधारणच असते .तुमच्या चाणाक्ष दृष्टिकोनामुळे उद्योगधंद्यात चढती कमान असते. केलेल्या कष्टाची चीज होते. आर्थिक बाजूचा एकूण विचार करता तुम्ही नशीबवान ठरता.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार,
शुभ अंक:- 1, 3, 5.
शुभ रंग:- पिवळा.
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज कामात शिस्त ठेवावी लागेल. घर आणि नोकरी दोन्हीकडे जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, विशेषतः थकवा जाणवू शकतो.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
बुद्धीचा योग्य वापर केल्यास अडलेली कामे मार्गी लागतील. महिलांसाठी आज संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरेल. खर्च वाढू शकतो, पण आवश्यक कामासाठी असेल. कुटुंबात समजूतदारपणा ठेवा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
चंद्र–बुध योगामुळे विचार स्पष्ट राहतील. ऑफिसमध्ये तुमच्या मताला महत्त्व मिळेल. महिलांना आत्मविश्वास वाढेल. भावनिक बाबतीत मात्र घाईघाईने निर्णय टाळा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
आज नातेसंबंधात थोडा ताण जाणवू शकतो. पती/कुटुंबीयांशी शांतपणे संवाद साधा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास फायदा होईल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमचं नेतृत्व गुण दिसून येतील. स्त्रियांसाठी कामात प्रशंसा किंवा मान मिळण्याची शक्यता. आर्थिक बाबतीत फायदा होईल. मात्र अहंकार टाळावा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
चंद्र लाभ बुध असल्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महिलांना शिक्षण, लेखन, प्लॅनिंगमध्ये यश मिळेल. घरात एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
शुक्र–हर्षल योगामुळे मन अस्थिर राहू शकते. नात्यांमध्ये गैरसमज टाळा. खर्च अचानक वाढू शकतो. सौंदर्य, कला, फॅशनशी संबंधित महिलांना नवे विचार सुचतील.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज तुमची मानसिक ताकद वाढेल. कामात एकाग्रता राहील. महिलांनी गुप्त गोष्टी उघड न करण्याची काळजी घ्यावी. आरोग्य ठीक राहील.सोशल मीडियावर एखादी टिप्पणी चे कौतुक होईल.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
नवीन योजना आखण्यासाठी दिवस योग्य आहे. स्त्रियांसाठी आज बुद्धी आणि अनुभव यांचा सुंदर संगम होईल. प्रवास किंवा महत्त्वाची भेट होण्याची शक्यता.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा. जबाबदाऱ्या वाढतील पण त्या तुम्ही उत्तम पार पाडाल. महिलांना कामात स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळेल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अनावश्यक विचार टाळा. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे.प्रवासातून लाभ होईल.
मैत्री मुळे फायदा होईल. महिलांसाठी सामाजिक वर्तुळ वाढेल. कामात नवीन संधी दिसू शकते. भावनिक समाधान मिळेल.प्रवास घडेल.