लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
शुक्रवार, 12 डिसेंम्बर 2025.
मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी
राहू काळ: सकाळी 10:30 ते 12
आज उत्तम दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह/सकाळी 10:21 नंतर कन्या .
12 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरु ग्रहाचा प्रभाव आहे अधिकार वृत्ती व प्रामाणिकपणा या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे आहे महत्त्वकांक्षाबरोबर पोकळ गर्वही आहे .जीवनातील आनंद भोगण्याकडे कल असून दुसऱ्याच्या स्वार्थामुळे ज्याला काही गमवावे लागले अशा व्यक्तींसाठी त्याग करायला तुम्हाला आवडते. तुमच्याकडे उच्च प्रतीचा ध्येयवाद आहे इतरांच्या सोबतचे तुमचे संबंध हळुवारपणे पणाचे आणि संवेदनाशील असतात. बारा अंकात एक हा अंक रवीचा आहे व दोन हा चंद्राचा अंक आहे त्यामुळे रवि आणि चंद्र या दोन्ही ग्रहांचेही तुमच्यावर परिणाम होतात. व्यवस्थापक किंवा प्रशासक म्हणून काम करण्यास तुम्ही योग्य आहात. कला साहित्य मनोरंजन हे गुणही तुमच्याकडे असतात. चंद्रग्रहण मुळे उच्चकल्पना शक्तीची जोड मिळून प्रतिभाषाली व्यक्तिमत्व होते. उत्तम कथा लेखक म्हणून सुद्धा तुम्ही नावारुपास येऊ शकता .स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि वर्चस्व गाजवण्याच्या मृत्यूमुळे तुम्ही एक कुशल राजकारण पटू सुद्धा बनू शकतात. मंत्री राजदूत ,न्यायमूर्ती इत्यादी पदांवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. सामाजिक जीवनाचे आवड असल्याने व मुत्सद्दी पणा असल्याने संरक्षण खात्यात किंवा उच्च अधिकारी पदावरही तुम्ही राहू शकता.
तुम्ही प्रेमळ आणि दयाळू असुन न्यायी प्रवृत्तीचे आहात. इतरांच्या संवेदना तुम्हाला चटकन समजतात. तुम्ही धार्मिक असून गूढ गोष्टींची तुम्हाला आवड आहे. तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड उत्साह, अभ्यासू स्वभाव. बुद्धिमान, दीर्घोद्योगी हे तुमची लक्षणे आहेत. मोठ्याने बोलणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे. इतरांना तुम्ही मनमोकळी दाद देतात. इतरांच्या मतांचा तुम्ही आदर करतात. तुमच्या चांगुलपणाचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा जपणारे आहेत. स्वतःचे काम स्वतःच करणे आवडते. बुद्धिमान, हुशार, सखोल अभ्यास करणाऱ्या व्यक्तींकडे तुमचा ओढा असतो .जीवनात तुम्ही यशस्वी होता तुमच्या व्यक्तिमत्वामुळे सतत उत्कर्ष होत राहतो .योग्य न्याय देणारे न्यायाधीश धर्मगुरू शिक्षक तत्त्वज्ञानी हे गुरुचे अमलाखाली येतात. तुमच्या आत्मविश्वास असून स्वतःचे निर्णय स्वतः घेतात . चालीरीती पाळण्याची आवड आहे .तुमच्या भावना उत्स्फूर्त असून तुम्ही मोकळेपणाने दाद देता. तुमची वृत्ती सहिष्णू व दुसऱ्याच्या विश्वासास पात्र असते. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जाऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहणे गरजेचे आहे.
उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची तुमची क्षमता असल्याने पैशाच्या बाबतीत तुम्ही सुखी असतात .जीवनमान चांगले असले तरी अनावश्यक गोष्टीवर खर्च करत नाहीत. तुमच्यातील इच्छाशक्ती ,नेतृत्व, उत्साह तुम्हाला सतत यश देत राहते. पैशावर आधारित सर्व सुखी तुम्हाला मिळतात. आपल्या पतीला योग्य ती साथ देण्यात तुम्ही वाकबगार असतात. गृहकृत्य व मुलांचे संगोपन उत्तम प्रकारे करतात .तुमच्या पतीच्या व्यवसायातही त्याला मनापासून मदत करता. उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची तुमची क्षमता असल्याने पैशाच्या बाबतीत सुखी असतात .जीवनमान चांगले असले तरी अनावश्यक गोष्टींवर खर्च करत नाहीत.. बुद्धिमान व तत्त्वज्ञानी लोकांकडे तुमचा ओढा असतो.
शुभ रंग:- पिवळा.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ अंक:- 3, 6. 9.
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रीणींनो आज
आज तुम्ही केलेल्या प्लॅनमध्ये अचानक बदल होऊ शकतात. तरीही दिवस तुमच्या बाजूने साथ देईल. कामात तुमचे सर्जनशील विचार चमकतील. नात्यात संवाद सांभाळा.
वृषभ
मैत्रीणींनो आज
घरगुती कामे आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना थोडा ताण,कसरत होईल. दुपारनंतर मन प्रफुल्लित होईल. कुटुंबातील स्त्रियांसोबत आनंदाचे क्षण. आर्थिक बाबतीत सावध राहा.
मिथुन
मैत्रीणींनो आज
तुमच्या कल्पकतेला आज मोठी साथ मिळेल. नवी कामे सुरू करायला चांगला दिवस. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रेमसंबंधात सौम्य गोडी वाढेल.
कर्क
मैत्रीणींनो आज
भावनांचा ओघ सकाळी जास्त असेल, चुकीचे निर्णय टाळा. दुपारनंतर आर्थिक सकारात्मकता वाढेल. घरासाठी काही खरेदीचे योग.
सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमचा आत्मविश्वास जास्त असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसमधील महत्वाचे काम तुमच्या हातात येऊ शकते. आरोग्य कडे लक्ष द्या.
कन्या
मैत्रीणींनो आज सकाळ ची सुरवात जरी संथ असली तरी नंतर
चन्द्र तुमच्या राशीत आल्याने उत्साह वाढेल. कामात प्रभावी प्रदर्शन. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा कराल. त्वचेची किंवा थकव्याची समस्या जाणवू शकते.
तुला
मैत्रीणींनो आज सकाळी महत्वाची कामे करून घ्या.नंतर व्यय स्थानी चन्द्र खर्च वाढवेल.
मनात दडपण वाटेल पण वास्तवात परिस्थिती तुमच्या बाजूने आहे. कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकू नका. खर्च नियंत्रित ठेवा.
वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चांगली बातमी मिळण्याची शक्यता. मित्रमैत्रिणींचा सक्रिय पाठिंबा. नातेसंबंधात रोमान्स वाढेल. आरोग्य उत्तम.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.
धनु
मैत्रीणींनो आज
महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. घाई केल्यामुळे चुका होऊ शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. घरात शांतता राखा.वाद टाळा.
मकर
मैत्रीणींनो आज
लांबच्या प्रवासाची योग. अध्यात्म किंवा ध्यानातून शांतता मिळेल. कामात प्रगती दिसेल. अनपेक्षित आर्थिक लाभ.
कुंभ
मैत्रीणींनो आज
भावनिक संवेदनशीलता जास्त असेल. व्यक्त होण्याआधी विचार करा. जोडीदाराशी गैरसमज दूर करण्याची संधी. कामात नवी दिशा.
मीन
मैत्रीणींनो आज
दुपारनंतर कामाचा भार वाढेल. पण तुम्ही तो सहज सांभाळाल. नात्यात स्थिरता. आरोग्य सुधारेल. आर्थिक निर्णय सावधतेने घ्या