लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं गुरुवार, 11 डिसेंम्बर 2025.
मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी/अष्टमी
कालाष्टमी
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
“आज चांगला दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह(विश्कंभ योग).
11 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र आणि गुरू ग्रहाचा प्रभाव आहे.
तुमचा जीवनाविषयी भावनिक व आध्यात्मिक दृष्टीकोन असतो.आधुनिक चालीरीती ना काहीसा विरोध असून परंपरा पाळण्याकडे कल असतो. आवडत्या लोकांसाठी कोणतेही काम करण्यास तयार असता.नाविण्याचे भोक्ते असता.नम्र स्वभाव असून आपल्या गुणांचे प्रदर्शन करायला आवडत नाही.चन्द्र गुरू युतीमुळे भविष्यातील घटनांची पूर्वसूचना आधीच मिळते.मनातल्या सुप्त शक्ती जागृत असतात.बहुतेक करून प्रेमात आणि आयुष्यात यश मिळते. अधिकार व मानमरातब प्राप्ती होतात.धीरगंभीर असून मित्र मैत्रिण व नातेवाईकांशी सच्चेपणा ने वागता. विनाकारण चिंता करण्याचा स्वभाव असतो.गुप्त शत्रूंपासून सावधगिरी पाळावी.
तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या प्रगल्भ संकल्पना शक्ती असते .मान मरातब आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही कृती करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार व कल्पना तुम्ही प्रत्यक्ष आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे .तुमच्या सहकारी वृत्ती असून दुसऱ्याचे विचार व भावना यांची कदर करतात चांगले वाईट तुम्ही सहजपणे समजू शकता .स्वप्नाळू स्वभाव असतो. कामात व्यवस्थितपणा टापटीप आढळून येते. आळशीपणा असतो. कल्पना व महत्त्वकांक्षा यांचा संगम झाल्यामुळे मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला रस असतो. गुरु ग्रहामुळे तत्वज्ञान व स्थिर वृत्ती प्राप्त होत असली तरी चंद्रामुळे अस्वस्थता व चंचलतेचा प्रत्यय येतो .तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. दुसऱ्याला आकर्षण घेण्याची एक संमोहन शक्ती तुमच्याकडे आहे. कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. धर्माबद्दल तुम्हाला ओढ असते पण कर्मकांडावर विश्वास नसतो .निसर्गाबद्दल प्रेम असून समुद्र तारे यांच्या बद्दल आकर्षण असते. तुमचा उत्कर्ष 29 वर्षानंतर होतो. दुसऱ्याला मदत करणे आणि यात तुम्हाला आनंद होतो महत्त्वकांक्षी योजना मुळे आर्थिक स्थितीत चढ-उतार होत असतो .वयाच्या 38 वर्षापासून आर्थिक स्थिती समाधानकारक बदल होतो. अस्वस्थ स्वभावामुळे विनाकारण खर्च होतो .तुम्ही अतिशय प्रेमळ आपुलकीने वागणाऱ्या व निष्ठावान आहात. तुमच्यात लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपतात .दिमाख व वैभवशाली जीवनाकडे तुमचा असतो. बागबगीच्या व पाळीव जनावरांची आवड असते. घरात आनंद व शांतता ठेवण्यात कडे तुमचा कल असतो .आपल्या पतीला सर्व प्रकारे साथ देण्यात तुम्ही वाकबगार असता. उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता. ज्यांच्याकडे मान मरातब ,प्रतिष्ठा ,अधिकार व महत्त्वकांक्षा आहे अशा मित्र-मैत्रिणींशी चांगले जुळते.
शुभ दिवस- सोमवार,गुरुवार, शुक्रवार
शुभ अंक – २,६,९
शुभ रंग – पांढरा, बदामी,जांभळा
शुभ रत्न:-मोती,हिरा, पुष्कराज,चंद्र मणी(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रीणींनो आज
आज सिंह चंद्रामुळे तुमची ऊर्जा उत्तम राहील. कामात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या समतोलात ठेवल्यास सर्वकाही सुरळीत पार पडेल. प्रेमसंबंधात थोडे गैरसमज होऊ शकतात—शांतपणे संवाद करा. त्वचा-संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो.
उपाय: पाण्याशी संबंधित कामं जपून करा.
उपाय -आज निळा रंग शुभ.
वृषभ
मैत्रीणींनो आज
घर, कुटुंब आणि आर्थिक नियोजनावर विशेष लक्ष जाईल. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे आई-वडील किंवा घरातील महिलांसोबत मतभेद संभव. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय पुढे ढकला. भावनिक स्थिरता राखणे महत्त्वाचे.
उपाय: कुलदेवीची प्रार्थना करण्याने मन शांत राहील.
मिथुन
मैत्रीणींनो आज
आज संवाद कौशल्य जबरदस्त. महत्वाच्या भेटी, दस्तऐवजीकरण, फोन कॉल्समध्ये यश मिळू शकते. स्त्रियांसाठी आज सोशल नेटवर्क, मैत्री, शिक्षणाच्या बाबतीत चांगले संकेत. प्रवासाचे योग आहेत.
उपाय: तुळशीची पाने पाण्यात टाकून प्या – ताजेतवाने वाटेल.
कर्क
मैत्रीणींनो आज
आर्थिक क्षेत्रात प्रगती. एखादा अडकलेला पैसा मिळण्याची चिन्हे. चंद्र सिंह राशीत असल्याने तुम्ही खर्चात वाढ करू शकता—नियंत्रण आवश्यक. संसारात प्रेम, आपुलकी वाढेल पण संवेदनशीलता जास्त असेल.
उपाय: आज पांढरा रंग किंवा मोतीसदृश अलंकार तुमच्यासाठी शुभ.
सिंह
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत—आज तुम्ही केंद्रस्थानी रहाल.तुमचा प्रभाव वाढेल. आत्मविश्वास, करिष्मा, आकर्षण वाढलेले जाणवेल. महिलांसाठी नवा लूक, नवीन वस्त्र, मेकओव्हर शुभ.स्वतःसाठी वेळ द्याल. प्रेमसंबंधात उत्तम वेळ. पण रवी-चंद्र योगामुळे काहींना हलका चिडचिडेपणा येऊ शकतो.
उपाय: 10 मिनिटे सूर्य नमस्कार किंवा वॉक करा.
कन्या
मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज अंतर्मुखता, शांतता, मानसिक विश्रांती यांची आवश्यकता भासेल. काही जुन्या भावनिक गोष्टी जागृत होऊ शकतात. कामात गुप्त विरोध किंवा पडद्यामागील चर्चा जाणवतील—तुमचे काम प्रामाणिकपणे करत रहा.
उपाय: घरी धूप किंवा अत्तर लावा—ऊर्जा स्वच्छ होईल.
तुळ
मैत्रीणींनो आज
आज नवे मित्र, नवीन संपर्क, समूहामधील कामांमध्ये लाभ. स्त्री वर्गासाठी सामाजिक कामे, ऑनलाइन नेटवर्क्स, कुटुंबातील समारंभात अनुकूलता. प्रेमसंबंधात आनंद. आर्थिक लाभाचे संकेत.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.
उपाय: हलका गुलाबी रंग वापरावा.
वृश्चिक
मैत्रीणींनो आज
कर्मक्षेत्रात जबाबदारी आणि दबाव. वरिष्ठांशी संवाद संयमाने करा. महिलांना घर आणि नोकरी/व्यवसाय दोन्ही सांभाळताना थकवा होऊ शकतो. मात्र, तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत. प्रेमातील तणाव टाळण्यासाठी शांततेने निर्णय घ्या.
उपाय: ओम नमः शिवाय जपा – मन स्थिर राहील.
धनु
मैत्रीणींनो आज
शिक्षण, प्रवास, आध्यात्मिकता आणि सर्जनशील क्षेत्रात मोठी प्रगती. बुध-नेपच्यून योगामुळे लिखाण, कला, संगीत,क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या महिलांना उत्तम परिणाम. आज मन फार सकारात्मक.
उपाय: आज सुवर्ण किंवा केशरी रंग वापरा.
मकर
मैत्रीणींनो आज
भावनिक चढउतार, जोडीदारासोबत गंभीर चर्चा. काही महिलांना आर्थिक व्यवहार, लोन, पॉलिसी याबद्दल निर्णय घ्यावा लागू शकतो—काळजीपूर्वक निर्णय घ्या. आरोग्यात – हार्मोन्स, चक्कर, BPची थोडी काळजी.
उपाय: गोड खा किंवा गरम पाणी प्या – मानसिक शांतता वाढेल.
कुंभ
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात सुधारणा, जोडीदाराशी मोकळा संवाद. विवाहित महिलांसाठी कौटुंबिक वातावरण अनुकूल. व्यवसायिक पार्टनरशिपमध्ये फायदा. आरोग्य चांगले.
उपाय: आज चांदीचा स्पर्श,घालणे (बांगडी, अंगठी किंवा चेन) शुभ.
मीन
मैत्रीणींनो आज
दैनंदिन कामात वेग, कार्यक्षमता आणि शिस्त. आरोग्य सुधारेल. आज उपचार, ब्यूटी-ट्रीटमेंट, फिटनेस प्लॅन सुरू करणे फारच चांगले. कामात यश कमी मिळेल.
उपाय: पायांना तूप किंवा नारळ तेलाने मालिश – ऊर्जा वाढेल