Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख वार

शनिवार, 15 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण एकादशी उत्पत्ती एकादशी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या
(विश्कुंभ योग, बव करण शांती)

15 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
प्रेम सहानुभूती आदर याचे प्रतीक म्हणजे शुक्रदेवता तुम्ही जन्मतः कलाकार आणि कला प्रिय आहात तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. उद्योगाचे किंवा व्यवसायाचे संघट संघटन करण्याची क्षमता तुमच्यात आहे .स्वतंत्रपणे काम करण्याची आवड असून कोणाची लुडबुड सहन होत नाही. डोके शांत ठेवल्यास अतिउच्च जागा भूषवणे शक्य होते ,परंतु हट्टीपणामुळे शत्रुत्व निर्माण होऊन आयुष्यात अडचणी येतात .बोलण्यात आकर्षण व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमचा प्रभाव पडतो. सामाजिक रूढी बंधनांना तुम्ही फाटा देता .तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते तुमच्या सहा भाग्यांक हा सौंदर्य ,आरोग्य ,सामर्थ्य, प्रेम आपुलकी ,आकर्षण याचा निदर्शक आहे .पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळू शकतो परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्च करण्याची वृत्ती असते .उच्च प्रतीचे कपडे ,दाग दागिने सुगंधी द्रव्य ,जडजवाहीर, विविध सुंदर वस्तूचे तुम्हाला आकर्षण वाटते. स्वतःच्या प्रेमसंबंधावर दुसऱ्याकडून होकाराची शक्यता असेल तरच पुढे पाऊल टाकता. तुम्ही कामात पद्धतशीर व अभ्यासू , उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी समाजाला तुमची जरुरी असते. पैसा मिळवणे व संचय करणे हे तुमचे ध्येय नाही .तुम्ही खर्चिक असूनही सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी पैसा खर्च होतो. कले कलेसाठी खर्च केलेल्या पैशाबद्दल कधीच पश्चाताप होत नाही. उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असता. तुम्ही हुशार हरहुन्नरी कर्तुत्ववान व पतीशी जुळवून घेणाऱ्या असता.समाजप्रिय असता, त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते स्वभावाने नम्र असतात. एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल पण इतरांवर त्याचा वाईट परिणाम होऊ देणार नाही. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात त्याच्या व्यवसायात मदत करता.ज्यांच्या धैर्य आक्रमकता पुढारीपणा वक्तृत्व आहे अशाबद्दल तुम्हाला जवळीक वाटते.

शुभ दिवस:- बुधवार ,शुक्रवार आणि सोमवार ,मंगळवार.

शुभ रंग:- निळा, गुलाबी

शुभ रत्न:- हिरा ,मोती आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज तुम्ही कामात जलद निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभाची चिन्हे. आरोग्य सामान्य राहील. घरातील जबाबदाऱ्या नीट पूर्ण करतील.

♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
चन्द्र लाभ बुध योगामुळे नोकरी–व्यवसायात अनपेक्षित लाभ. घरात शुभघटना. स्त्रियांसाठी खरेदीसाठी उत्तम वेळ.

♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आज तुमची संवादकौशल्ये प्रभावी राहतील.इतरांवर प्रभाव वाढेल. मित्रमैत्रिणीसोबत चांगला वेळ जाईल. ऑफिसमध्ये कौतुक मिळेल.

♋ कर्क
मैत्रीणींनो आज
आज मन शांत पण व्यवहारात व्यावहारिक राहणे गरजेचे. जुने अडथळे दूर होतील. मुलांकडून आनंद दायक बातमी मिळेल.

♌ सिंह
मैत्रीणींनो आज
चन्द्र त्रिकोण हर्षलमुळे अचानक चांगली बातमी. सोशल लाइफ सक्रिय. सौंदर्य, फॅशन, ज्वेलरी ,कला क्षेत्रातील महिलांना विशेष लाभ.

♍ कन्या
मैत्रीणींनो आज
चन्द्र तुमच्या राशीत — ऊर्जा वाढलेली जाणवेल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आरोग्य सुधारेल.अचानक लाभ होतील. सोशल मिडिया मार्फत लाभ होतील,कौतुक होईल.

♎ तुळ
मैत्रीणींनो आज
आज खर्च वाढेल परंतु योग्य ठिकाणी. मन धार्मिक–आध्यात्मिक विषयाकडे ओढले जाईल. वैवाहिक जीवन समाधानकारक.

♏ वृश्चिक

मैत्रिणींकडून आज मदत मिळेल. कामे मार्गी लागतील. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता. भावनिक निर्णय टाळा.

♐ धनु
मैत्रीणींनो आज
कामाचा तणाव थोडा जाणवेल पण प्रयत्न यशस्वी होतील. करिअर संदर्भात शुभ संधी. पतीची साथ मिळेल.

♑ मकर
मैत्रीणींनो आज
आज भाग्य मजबूत. दूरचे प्रवास, शिक्षण आणि स्पर्धेत यश. नवीन शिकण्याची इच्छा वाढेल.

♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आरोग्याची थोडी काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. कुटुंबात जुळवून घेण्याचा सल्ला.

♓ मीन
मैत्रीणींनो आज
वैवाहिकजीवनात /प्रेमसंबंधात समाधान. चांगला संवाद होईल. ऑफिसमध्ये काम सुरळीत पार पडेल

RELATED ARTICLES

Most Popular