लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार मंगळवार, *11 *नोव्हेंबर 2025*. कार्तिक कृष्ण सप्तमी
राहू काळ – दुपारी 3 ते 4:30
आज दुपारी 12 नंतर चांगला दिवस.भद्रा सकाळी 11:33 पर्यंत.
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क .(विष्टी करण शांती)
11 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चन्द्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक व आक्रमक दृष्टिकोन असतो. तुम्ही स्वभावाने नम्र असता. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. गुणविद्या तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींमध्ये तुम्हाला रस असतो. तुम्ही स्वभावाने अतिशय हवी असून लवकर अस्वस्थ होता. छोट्या छोट्या गोष्टीबद्दलची ही तुम्ही काळजी करता .झटपट निर्णय घेणे तुम्हाला आवडते. तुमच्या वागण्यात धीर गंभीरता असून मित्र, नातेवाईकांशी सच्चेपणाने वागतात .कोर्ट कचेरी करण्याची पाळी आल्यास तुमच्यावर अन्याय होतो. इच्छाशक्ती व करारीपणा याच्या जोरावर कोणत्याही अडचणींवर मात करता. स्मरणशक्ती उत्तम असते.
मान व प्रतिष्ठा यांची आवड असते.दुसऱ्यांचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तृत्व तुमच्याकडे असते.चांगल्या वाईट मधला फरक तुम्ही जाणता. ध्येय पूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही.विचार न करता उतावीळ पणे नवीन कामात घुसण्याची वृत्ती असते.तुमची चुक तुमच्या लक्ष्यात आली तरी ती मान्य करायला तयार होत नाही.खोटा अभिमान व मानी पणा तुमच्यात असतो.दीन दुबळ्या बद्दल दया व आदर असतो.तुमचे विचार धैर्याने व ठाम पणे मांडता.कायद्याचे पालन करायला आवडते. दूरच्या प्रवासाची आवड असते.कल्पना ,उत्साह असल्याने मोठमोठ्या योजना पार पाडण्यात आनंद वाटतो.उत्कर्ष 29 वयानंतर होतो.कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. तुम्हाला स्वतःच्या दिसण्याच्या व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात . घराची सजावट उत्तम असावी असे वाटते. दिमाख व वैभवशाली जीवनाकडे ओढ असते. बागबगीच्या व जनावरांची आवड असते. तुमच्याकडे लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते.
शुभ रंग:- किरमिजी,पांढरा, निळा
शुभ दिवस:- शुक्रवार, सोमवार मंगळवार
शुभ रत्ने:- मोती आणि पोवळे, हिरा.(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज चतुर्थस्थानात चन्द्र आहे.घरगुती कामांसाठी खर्च होईल.वाहन सौख्याचा. वास्तू विषयक कामे मार्गी लागतील.
वृषभ:- मैत्रिणींनो आज प्रवासातून लाभ होतील.कलाकारांना चांगला दिवस. भावंडासाठी खर्च कराल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज संवाद कौशल्य आणि विचार शक्ती वाढेल.नवीन कल्पनांना वाव मिळेल.प्रवास कार्यसाधक होतील. परस्पर संवादातून फायदा होईल.कौटुंबिक वाद टाळा.
कर्क:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. खर्च वाढणार आहेत. मात्र तरीही आनंदी राहाल. मौल्यवान क्षण अनुभवाल. घरातील वातावरण शांत ठेवा.प्रवास घडतील.
सिंह:- मैत्रिणींनो आज बुद्धिमत्तेचा वापर करून लाभ होईल.वाहन जपुन चालवा.जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
कन्या:- मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग. वादविवादात सरशी होईल.मैत्र मंडळी सोबत गप्पा रंगतील.त्यांच्यासाठी खर्च कराल.
तुळ:-मैत्रिणींनो आज कामानिमित्त प्रवास घडेल.उत्तम प्रशासकीय कौशल्य दिसेल.महत्वाकांक्षा वाढेल.सहकाऱ्यांची मदत होईल.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज विदेशात जाऊ इच्छुकांना खूष खबर मिळेल.चैन करण्यासाठी खर्च होईल.
धनु:-मैत्रिणींनो आज वाहन जपून चालवा.कागदपत्रे नीट तपासून घ्या.अति तेथे माती हे लक्षात ठेवा.अचानक खर्च उदभवू शकतो.
मकर:- मैत्रिणींनो आज मेहनत वाढवावी लागेलं.पतीची नाराजी होऊ शकते.प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने चांगला.शत्रूंचा नायनाट कराल.नोकरचाकर सहकार्य करतील.
मीन:- मैत्रिणींनो आज बोलण्यातून लाभ होईल.क्रीडाक्षेत्रात यश.प्रेमीकाना यश.