लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
सोमवार, *10 *नोव्हेंबर 2025*. कार्तिक कृष्ण षष्ठी
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
आज उत्तम दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन/दुपारी 1:03 नंतर कर्क.
10 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
तुम्ही जबाबदारीच्या जागा सांभाळू शकता .प्रत्येक वेळी स्वतंत्र व नवीन योजना करण्याकडे तुमचा कल असतो .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असते. स्वतःच्या निर्णयाबद्दल उतावळेपणाचा अनुभव येतो. कोणत्याही गोष्टीतील तुमची आवड चांगलीच असून फक्त चांगलीच गोष्ट तुम्ही निवडता .कोणत्याही विषयात खोलवर न जाता हे तुम्ही दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकता. तुम्ही हट्टी आणि स्वार्थी आहात .आई-वडील ,पत्नी इतर नातेवाईकांपासून तुम्हाला आर्थिक लाभ होतो वयाच्या 46 वर्षापासून उत्कर्ष होतो. नोकरी किंवा व्यवसायात अधिकाऱ्याची जागा मिळते. आत्मविश्वास व प्रतिष्ठा ही तुमची वैशिष्ट्य आहेत .तुमच्या इच्छाशक्ती नुसार तुम्हाला कीर्ती किंवा बदनामी मिळते. तुमची प्रकृती सुदृढ असून आजारातून लवकर बरे होतात. नातेवाईकांना तुमची मदत होते परंतु त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मात्र मिळत नाही .सतत बाहेर प्रवास करण्याची आवड असते. विस्तव व वाहन या गोष्टींपासून धोका असतो कायदे पाळायला आवडते. तुमच्या स्वभाव महत्त्वकांक्षी असून आणि गोष्टी तुम्ही रस घेता .तुम्ही स्वतंत्र विचारांचे वृत्तीचे असतात .सतत बदल करण्याकडे ओढ असते. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे वाटते. त्यामुळे बरेच चढ-उतार होतात. उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते. संभाषण चातुर्य असल्याने दुसऱ्यावर चटकन छाप पडते .कलेविषयी आकर्षण असून उत्साहाने भाग घेतात .इच्छाशक्ती दांडगी असते. व्यावहारिक जीवनावर बरोबरच गुढ विषयांचे सुद्धा आकर्षण असते .मानवी स्वभाव ओळखण्याचे ज्ञान उपजत असते .तुम्ही सभ्य, निस्वार्थी विशाल दृष्टिकोनाचे असता. तुम्ही आपले विचार दुसऱ्या वर लादता. जीवनातील रूढी,बंधने तोडण्याचे सतत प्रयत्न करतात. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो. विरोध करण्याच्या स्वभावामुळे गुप्त शत्रू तयार करतात. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. दुसऱ्यावर दया करण्यात सुप्त आनंद होतो.जीवन विषयक सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात .पैशाच्या बाबतीत अनेक चढ-उतार होतात असं होतं .उत्तम व्यक्तिमत्त्वामुळे तरांवर छाप टाकून व्यवसायात चांगला तर्हेने पैसा मिळतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तुम्ही महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .स्वतःचा नोकरी उद्योग करून उत्पन्नात भर घालतात .विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते .मैत्रीपूर्ण जीवनामुळे तुमचे घर म्हणजे एक सामाजिक केंद्रच असते. तुम्हाला अनेक गोष्टी त रस असतो .जीवन साथीदाराची निवड करताना आपल्यासारखाच उत्साही सौंदर्य प्रेमी ,उत्तम कपड्यांचे आवड असलेला घरात समाजात मिसळणारा असा निवडावा.
शुभ रंग:- सोनेरी पिवळा नारंगी किंवा जांभळा
शुभ दिवस:- रविवार सोमवार गुरुवार
शुभ रत्ने:- माणिक आणि पाचू.
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे.वाहन सौख्याचा दिवस. छोटे प्रवास घडतील.भावंडकडून लाभ होतील.घरगूती कामात व्यस्त रहाल.कलाकारांना छान.
वृषभ:- मैत्रिणींनो आज कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल.आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.आर्थिक लाभ होतील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज मन उत्साही व आनंदी राहील.स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्याल.इतरांवर प्रभाव राहील.
कर्क:-मैत्रिणींनो आज धार्मिक कामांसाठी वेळ द्याल.प्रिय व्यक्ती सोबत मस्त शॉपिंग कराल.दागिने खरेदी ची शक्यता.
सिंह:- मैत्रिणींनो आज मैत्र मंडळी सोबत भेटीगाठी होतील.एखाद्या समारंभात भाग घ्याल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळु शकते.घरातल्या सजावटी वर खर्च कराल.
कन्या:- मैत्रिणींनो आज तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.कामानिमित्त प्रवास घडेल.मन आनंदी राहील.विवाह इच्छुक तरुणींना मनपसंत जोडीदाराशी भेट घडू शकते.
तुळ:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे.भाग्यवर्धक घटना घडतील.पतीची साथ लाभेल.धार्मिक कार्य घडेल.तीर्थयात्रा घडू शकतात.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज कामाचा थकवा जाणवेल.वाहन जपून चालवा.दुखणी अंगावर काढू नका,योग्य सल्ला घ्या.
धनु:-मैत्रिणींनो आज अनुकूल दिवस.जोडीदाराकडून आनंददायी बातमी मिळेल.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.
मकर:- मैत्रिणींनो आज महत्वाची कामे होतील.नवीन नोकरी इच्छुकांना खूष खबर मिळेल.सामजिक कार्यात भाग घ्याल.दगदग टाळा.
कुंभ:- मैत्रिणींनो आज अनुकूल दिवस आहे.संतती कडून सुखदायी बातमी मिळू शकते. एखादे बक्षिस, शाबासकी ची थाप मिळेल. मेहनतीच्या मनाने उत्तम यश मिळेल.
मीन:- मैत्रिणींनो आज राहत्या वास्तू चे प्रश्न मार्गी लागतील.एखाद्या समारंभात भाग घ्याल.वाहन सौख्य लाभेल.घरकामासाठी वेळ द्याल