लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
रविवार, 9 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण पंचमी
राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन
9 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे.
प्रतिकार ,धाडस ,तत्परता हे तुमच्यातच असते. तुम्ही लढाऊ वृत्तीचे आहात. पराभव ही गोष्ट तुमच्या गावी हे नसते. नेहमीच आक्रमक असतात .पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला तोंड देण्याची कुवत तुमच्याकडे आहे .तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो ,परखडपणा व उद्धटपणात जाणवतो. शक्यतो दुसऱ्यावर टीका करू नये शब्द काळजीपूर्वक वापरावेत अन्यथा तुमच्यावरच ते उलटतात. तुम्ही तापट व धाडसी असतात .उद्धटपणा जोर सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतो खेळ व शक्तिशाली व्यायामाचे आवड असते. लैंगिक भावना तीव्र असतात. कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही .मुले व प्राणी प्रिय असतात. तुम्ही प्रवास खूप करता. त्यामुळे सहनशीलता व आपलेपणा निर्माण होतो. तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीच्या तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. मित्र किंवा नातेवाईक यांच्याबाबत पैशाची मदत करताना विचारपूर्वक करा. तुमच्या आवडीनिवडींबाबत तुम्ही ठाम निर्णय घेता, तुमची तत्त्व सोडत नाही.
पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान असता. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .घरातल्या सुखयोयी वर ,प्रिय व्यक्तीवर खर्च करायला मागेपुढे पाहत नाही . पैशामुळे जेवढे सुखे उपभोक्ता येतात त्या सर्वांचा आनंद तुम्ही लुटू शकता. श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची योग्यता असल्याने साहजिकच पैशाची आवक होते .तुम्ही उत्साही ,कार्यक्षम कार्य कुशल असून महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. स्वतः व्यवसाय करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता तुम्ही राग येतो .हट्टी असून सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हाव्यात याबद्दल तुम्ही दक्षता मुलाबाळांवर व घरातील नोकर माणसांवर तुमचा वचक असतो. बोलण्यात स्पष्टपणा व फटकळ पणा असल्याने इतर दुखावले जातात नोकर मंडळी फार काळ टिकणे कठीण असते.
शुभ दिवस:- सोमवार मंगळवार, गुरुवार,शुक्रवार
शुभ रंग:- पिवळा, तांबडा पांढरा
शुभ रत्न:- पुष्कराज मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
🐏 मेष:
मैत्रीणींनो आज ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नवीन संपर्क लाभदायी ठरतील. प्रवासाची शक्यता. भावंडांशी संवाद वाढेल.
🐂 वृषभ:
मैत्रीणींनो आज
आर्थिक दृष्टीने स्थैर्य येईल. व्यवसायिक व्यवहारात लाभ. कौटुंबिक वातावरण शांत राहील. नवीन खरेदीची शक्यता.
👫 मिथुन:
मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने व्यक्तिमत्त्व तेजस्वी भासेल. रवी–चंद्र त्रिकोणामुळे सन्मान, यश, आणि प्रशंसा मिळेल. नवीन कल्पनांना चालना मिळेल.
🦀 कर्क:
मैत्रीणींनो आज
आत्मपरीक्षणासाठी उत्तम दिवस. काही जुन्या गोष्टींचा शेवट आणि नवीन सुरुवातीचा विचार करा. ध्यान व विश्रांती उपयोगी ठरेल.महत्वाची कामे आज नको.
🦁 सिंह:
मैत्रीणींनो आज
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रपरिवारातून मदत मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. कामात नेतृत्वगुण दिसून येतील.
🌾 कन्या:
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी यश. वरिष्ठांकडून कौतुक. उद्दिष्टे स्पष्ट ठेवा. आर्थिक क्षेत्रात थोडी स्थिरता जाणवेल.
⚖️ तुळ:
मैत्रीणींनो आज
धार्मिक, तात्त्विक किंवा परदेशाशी निगडित कार्यात प्रगती. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करणे सोपे जाईल. नवी दृष्टी मिळेल.
🦂 वृश्चिक:
मैत्रीणींनो आज
गुप्त स्रोतांतून लाभ होण्याची शक्यता. भावनिक दृष्टीने दिवस संवेदनशील. वाणीवर नियंत्रण ठेवा.
🏹 धनु:
मैत्रीणींनो आज
संबंधात सुधारणा. व्यावसायिक भागीदारीत प्रगती. रवी–चंद्र त्रिकोण योगाने लोकप्रियता वाढेल.
♑ मकर:
मैत्रीणींनो आज
कामात एकाग्रता वाढेल. आरोग्य सुधारेल. लहान तांत्रिक अडचणी दूर होतील. सहकाऱ्यांकडून मदत.
♒ कुंभ:
मैत्रीणींनो आज
सर्जनशील क्षेत्रात प्रगती. मुलांशी संवाद वाढेल. प्रेमात यश. मनोरंजनाचा आनंद घ्याल.
♓ मीन:
मैत्रीणींनो आज
घरगुती वातावरणात शांतता. घराची सजावट, दुरुस्तीची कामे होतील. मातेसंबंधी विषय महत्वाचे ठरती