Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

गुरूवार, 6नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण प्रतिपदा

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज कृतिका वर्ज्य दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मेष/सकाळी 11:47 नंतर वृषभ
(व्यतिपात, वरीया योग शांती)

6 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
प्रेम सहानुभूती आदर याचे प्रतीक म्हणजे शुक्रदेवता तुम्ही जन्मतः कलाकार आणि कला प्रिय आहात तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. उद्योगाचे किंवा व्यवसायाचे संघट संघटन करण्याची क्षमता तुमच्यात आहे .स्वतंत्रपणे काम करण्याची आवड असून कोणाची लुडबुड सहन होत नाही. डोके शांत ठेवल्यास अतिउच्च जागा भूषवणे शक्य होते ,परंतु हट्टीपणामुळे शत्रुत्व निर्माण होऊन आयुष्यात अडचणी येतात .बोलण्यात आकर्षण व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमचा प्रभाव पडतो. सामाजिक रूढी बंधनांना तुम्ही फाटा देता .तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते तुमच्या सहा भाग्यांक हा सौंदर्य ,आरोग्य ,सामर्थ्य, प्रेम आपुलकी ,आकर्षण याचा निदर्शक आहे .पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळू शकतो परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्च करण्याची वृत्ती असते .उच्च प्रतीचे कपडे ,दाग दागिने सुगंधी द्रव्य ,जडजवाहीर, विविध सुंदर वस्तूचे तुम्हाला आकर्षण वाटते. स्वतःच्या प्रेमसंबंधावर दुसऱ्याकडून होकाराची शक्यता असेल तरच पुढे पाऊल टाकता. तुम्ही कामात पद्धतशीर व अभ्यासू , उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी समाजाला तुमची जरुरी असते. पैसा मिळवणे व संचय करणे हे तुमचे ध्येय नाही .तुम्ही खर्चिक असूनही सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी पैसा खर्च होतो. कले कलेसाठी खर्च केलेल्या पैशाबद्दल कधीच पश्चाताप होत नाही. उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असता. तुम्ही हुशार हरहुन्नरी कर्तुत्ववान व पतीशी जुळवून घेणाऱ्या असता.समाजप्रिय असता, त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते स्वभावाने नम्र असतात. एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल पण इतरांवर त्याचा वाईट परिणाम होऊ देणार नाही. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात त्याच्या व्यवसायात मदत करता.ज्यांच्या धैर्य आक्रमकता पुढारीपणा वक्तृत्व आहे अशाबद्दल तुम्हाला जवळीक वाटते.

शुभ दिवस:- बुधवार ,शुक्रवार आणि सोमवार ,मंगळवार.

शुभ रंग:- निळा, गुलाबी

शुभ रत्न:- हिरा ,मोती आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज स्वतःच्या आनंदासाठी खर्च होईल. सकाळी कामाचा तणाव राहील.क्रोध टाळा. दुपारनंतर आर्थिक लाभाचे योग.

वृषभ:- मैत्रीणींनो आज सकाळ संथ राहील.दुपारनंतर कलाकारांना उत्तम दिवस.प्रेमात सुसंवाद आवश्यक.मनाप्रमाणे कामे होतील.

मिथुन:- मैत्रीणींनो आज सकाळच्या सत्रात महत्वाची कामे उरका.मैत्रिणीची साथ मिळेल.विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळू शकतो.दुपारनंतर आरोग्य सांभाळा.

कर्क:-मैत्रीणींनो आज कामात प्रयत्न पूर्वक यश मिळेल.स्पर्धा जिंकाल. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदाची.मैत्री साठी खर्च कराल.

सिंह:- मैत्रिणींनो आज कल्पनाशक्ती दिसून येईल.परदेशात संपर्कातुन लाभ होतील. सकारात्मक विचार यश देतील.महिला सहकारयांमार्फत लाभ होईल.

कन्या:- मैत्रीणींनो आज अचानक धनलाभाची शक्यता.कौटुंबिक जीवनात भावनिक स्पष्टता ठेवा.दूरचे प्रवास फायदेशीर ठरतील.भाग्य उजळेल.

तुळ:-मैत्रीणींनो आज प्रिय व्यक्ती कडून शुभ समाचार मिळेल.आर्थिक उन्नती होईल.सामजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.संध्याकाळ धनलाभाची.

वृश्चिक:- मैत्रीणींनो आज जोडीदाराशी संवाद घडेल.मनातल्या चिंता दूर होतील.संध्याकाळ जोडीदारासोबत आनंदी.

धनु:-मैत्रीणींनो आज प्रवास कार्यसाधक होतील.मैत्र परिवाराकडून साथ मिळेल.कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल.स्त्रियांकडून लाभ होतील.

मकर:- मैत्रीणींनो आज कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना दमछाक होईल.आरोग्य जपा.प्रेमात यश

कुंभ:- मैत्रीणींनो आज नवीन कल्पना यशस्वी ठरतील.छोटे प्रवास होतील.पत्र,इमेल द्वारे छान बातमी मिळेल.शैक्षणिक यश लाभेल.घरातल्या सजावटी साठी खर्च कराल.

मीन:- मैत्रीणींनो आज कल्पकता दिसून येईल.मेजवानी मिळेल.छोटे प्रवास घडतील.भावंडाकडून भेटवस्तू मिळू शकत

RELATED ARTICLES

Most Popular