Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025. कार्तिक शुक्ल नवमी
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12

आज उत्तम दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ.

31 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
  तुमच्याकडे महत्वकांक्षा, तपस्या,अभिमान असतो.धर्मादाय,मुकबधीर, अपंग लोकांसाठी काम करण्याची आवड असते.वयाच्या 40 व्या वर्षांनंतर भाग्योदय होतो.पण यश कीर्ती लवकर मिळावी अशी अपेक्षा असते.व्यवहारिक दृष्टिकोन असून इच्छाशक्ती जबरदस्त असते.विरुद्ध लिंगी व्यक्ती मध्ये तुम्ही लोकप्रियता मिळते.सतत कामात मग्न रहायला आवडते. वरीष्ठ लोकांकडून मदत,सहकार्य,संरक्षण मिळते.उत्तम शब्द संपत्ती असल्याने भाषण,लेखन,बोलणे यात यश मिळते.सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात.
      हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मैत्र परिवार देखील सतत बदलत असतो. घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता .टापटीप आवडते. अनेक गोष्टीत रस असतो व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यात तुमचा हातखंडा असतो. तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्ती महत्त्वाच्या आहात .तुम्हाला घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नसते. तुमची वृत्ती तामसी असून काही वेळा कठोरपणा दिसून येतो.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.

शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.

शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रीणींनो आज लाभात चन्द्र आहे.
आज मन आनंदी राहील. नवे वस्त्र किंवा दागिने खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. पती-कुटुंबाकडून कौतुक मिळेल. स्वतःचा सन्मान जपा. आर्थिक लाभाची शक्यता.

♉ वृषभ
मैत्रीणींनो आज दशमात चन्द्र आहे.
घरातील जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही उत्तमरीत्या निभवाल. सासरकडून काही अपेक्षा पूर्ण होतील. शरीरावर थकवा जाणवेल — विश्रांती घ्या. घरसजावटीचा विचार कराल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज मित्रमैत्रिणींशी भेट होईल. जुनी गोष्ट आठवून मन थोडं भावूक होईल. कामावर स्तुती मिळेल. विवाहित स्त्रियांना सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज तुमचा आत्मविश्वास कमी राहील. कामाचा तणाव वाढेल. पतीशी जुळवून घ्या.पण घरगुती कामात थोडीशी अडचण येऊ शकते. जपून बोला.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज प्रवास किंवा ऑफिसच्या कार्यात अडथळे येतील पण दिवसाचा शेवट समाधानाने होईल. आरोग्याची थोडी काळजी घ्या. विवाहित स्त्रियांनी पतीला वेळ द्यावा.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व सर्वांना प्रभावित करेल. महिलांना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. आर्थिक बाजू स्थिर राहील.पतीची नाराजी राहील.

♎ तुला

मैत्रीणींनो आज भाग्यवृद्धीचा दिवस. गृहिणी महिलांसाठी आनंददायी वेळ. सौंदर्य, कला किंवा व्यवसायाशी संबंधित स्त्रियांना यश मिळेल.नवीन संधी चालून येतील. नात्यांमध्ये गोडवा राहील.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज मनात थोडी अस्थिरता राहील. आरोग्याची काळजी घ्या — विशेषतः रक्तदाब-संबंधी त्रास. संवादात संयम ठेवा. कामाचा वेग मांदावेल.संध्याकाळी सुखद बातमी मिळेल.

♐ धनु

मैत्रीणींनो आज नवीन संधी येतील — करिअरमध्ये प्रगती. शिक्षण, परीक्षा किंवा मुलाखतीत यशाची शक्यता.स्वास्थ्य आणि फिटनेस वर लक्ष दया. विवाहित महिलांसाठी दिवस प्रेमपूर्ण. सौंदर्यविषयक खरेदी योग.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
कार्यस्थळी स्त्रीसहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत आज सावध रहा.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज चंद्र तुमच्या राशीत आहे.आकर्षकता वाढेल. नव्या संकल्पना साकार होतील. प्रेम आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत शुभ योग. सामाजिक कामासाठी वेळ द्या.मेहनत जास्त करावी लागेल.कौटुंबिक सुखद समाचार मिळेल.

♓ मीन

मैत्रीणींनो आज गुप्त शत्रूपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण वाढू शकतो — ध्यान करा. विवाहित महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. दिवसभर लक्ष्मीमंत्राचा जप शुभ.

🌼 आजचा उपाय:
देवी महालक्ष्मीला पांढरी लालफुलं अर्पण करा.
संध्याकाळी तुपाचा दिवा दक्षिण दिशेकडे लावा.
“ॐ ह्रीं श्रीं लक्ष्म्यै नमः” – 11 वेळा जप करा.

RELATED ARTICLES

Most Popular