Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

बुधवार, 29 ऑक्टोबर 2025.कार्तिक शुक्ल सप्तमी

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज 9 वा पर्यंत चांगला दिवस .भद्रा सकाळी 9:24 नंतर
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर
(विष्टी करण शांती)

29 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर चन्द्र आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे असून दुसऱ्याला शिकवणे तुम्हाला आवडते. इतरांना मदत करते वेळी घाईघाईने निर्णय घेतले जातात .तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. प्रेमाच्या बाबतीत प्रचलित रुढी मोडण्यास तयार असतात. जीवन यशस्वी होण्यासाठी तुम्ही सावधगिरीने वागता. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात .श्रीमंत व्यक्तीशी विवाह होऊन विवाह नंतर भाग्योदय होतो .उच्च पदस्थ लोकांकडून तुम्हाला मदत मिळते ,त्याबाबतीत तुम्ही नशीबवान असतात.
तुम्हाला मानमरातब आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही वागता ,याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही समाजप्रिय आहात. नावीन्य व प्रवासाची आवड असते. तुम्ही हुशार ,तल्लख आणि शास्त्रीय गोष्टीची आवड असणारे असता. तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो .प्रेम ,सहानुभूती व आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही बोलण्यात आकर्षक व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमची छाप पडते. मैत्रिणींच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करता.चांगले वाईट यातील फरक समजू शकतात .कल्पना व उत्साह यांचा संगम झाल्याने मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला आनंद वाटतो. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमच्यात नम्रता असून आपली गुणवैशिष्ट्ये दुसऱ्याच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न करतात कायद्याचे पालन करणे आवडते .वयाच्या 38 व्या वर्षापासून आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात. तुम्ही खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करता. परंतु सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा तुम्हाला मिळतो .विवाह हा तुमच्या आवडीचा विषय असून लवकर लग्न करता. वैवाहिक जीवनात येणारे अडीअडचणींना शांतपणे तोंड देता .तुम्ही उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात .तुम्ही हुशार ,हरहुन्नरी ,कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेता. तुमच्या लोकप्रियतेमुळे घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता.विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असता.

शुभ दिवस :- मंगळवार ,सोमवार ,शुक्रवार

शुभ रंग :- पांढरा ,पिवळा ,निळा.

शुभ रत्ने:- हिरा ,मोती .
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासुन घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज कामात सातत्य ठेवा.पतीकडून कौतुक होईल.वरीष्ठ खूष असतील.नात्यात तणाव येऊ शकतो, सबुरीने घ्या.पर्यटन घडेल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज शांततेत दिवस घालावा.आरोग्यकडे लक्ष द्या.प्रवासात विलंब संभवतो.

मिथुन:-मैत्रिणींनो आज कामात सुधारणा होईल. मैत्र मंडळींचे सहकार्य मिळेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज भावनाशील होऊन निर्णय नको. आरोग्य सांभाळा. मानसन्मान मिळेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज धनप्राप्ती चांगली होईल.कामात तुमचा वरचष्मा राहील.नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज छान दिवस.कामात लक्ष केंद्रित करा.संतती कडून आनंद मिळेल.घरातले वातावरण आनंदी राहील.

तुळ:-मैत्रिणींनो आज सामान्य दिवस.सबुरीचा सल्ला देण्यात येत आहे.आरोग्याकडे लक्ष द्या.भावनिक आंदोलने मनात असतील.

वृश्चिक:-मैत्रिणींनो आज अतिशय सुंदर दिवस.प्रगती होईल.प्रयत्नशील बनाल,त्यात यश येईल.आपले मत ठामपणे मांडा.

धनु:-मैत्रिणींनो आज उत्साह वाढेल.नवीन ओळखी होतील.प्रवासाचे योग.

मकर:- मैत्रिणींनो आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.अचानक लाभाची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य सुदृढ राहील.

कुंभ:-मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.आकस्मित खर्च होतील पण त्यातून आनंद लाभेल.रुटीन चालु ठेवा.वाहन काळजीपूर्वक चालवा.गुप्त विरोधकांपासून सावध रहा.

मीन:-मैत्रिणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे.नवीन संधी चालून येतील.स्वतःची ताकद ओळखा. अनपेक्षित लाभ होती

RELATED ARTICLES

Most Popular