Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

रविवार, 26 ऑक्टोबर 2025. कार्तिक शुक्ल पंचमी

राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज सकाळी 11 नंतर चांगला दिवस.कड पंचमी, पांडव पंचमी
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक/सकाळी 10:47 नंतर धनू

26 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत.चंद्राचा ही प्रभाव असल्याने चंचलता, अस्वस्थता ही असते.नीटनेटके पणा, सौदर्य प्रसाधने,गृहसजावट  याची आवड असते.प्रवासाची आवड आणि मैत्रिणींचा सहवास आवडतो.विरुद्धलिंगी व्यक्ती बाबतीत आक्रमक पवित्रा घेता.पैशाच्या बाबतीत नशिबवान असून सहजपणे पैसा मिळतो.प्रेमात समस्या होतात. घराबद्दल आणि प्रियजनांबद्दल ओढ असते.मोठया व महत्वाकांक्षी योजना पार पाडण्यात आनंद वाटतो.तुमच्याकडे उस्फुर्त पणा, उत्साह,जिवंतपणा असतो.
   शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेणे तुम्हाला पसंत नसते. समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज सकाळ जरी संथ राहिली तरी दुपारनंतर नशिबाची साथ मिळेल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.अपमान चे प्रसंग येऊ शकतात. वाहन जपून चालवा.

मिथुन:-मैत्रिणींनो आज नोकरी/व्यवसायात उन्नती होईल.मान मिळेल.कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज सकारात्मक विचार कराल.संतती ची साथ मिळेल. नेतृत्व गुण उठून दिसतील. मात्र अनपेक्षित खर्च होतील.

सिंह:- मैत्रिणींनो आज कामाचे नियोजन बदलेल.सार्वजनिक कार्यात भाग घ्याल.गृह कार्यात व्यस्त रहाल.

कन्या:- मैत्रिणींनो आज छोटे प्रवास घडतील.,कौटुंबिक वातावरण शांत ठेवा.संध्याकाळ मेजवाणीची.

तुळ:-मैत्रिणींनो आज
आर्थिक दृष्टीने चांगला दिवस.कामे मनाप्रमाणे होतील.कायदे पाळा.व्यवसायात यश.छोट्या सहली घडतील.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज धाडसी स्वभाव उफाळून येईल.मेजवानी चे योग. मानसन्मान मिळेल.

धनु:-मैत्रिणींनो आज सकाळ जरी आसळसावलेली असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल.प्रतिष्ठा वाढेल.मनात अनामिक भय वाटेल.

मकर:- मैत्रिणींनो आज स्वाभिमान जपा.गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल.सामजिक कार्य कराल,त्या साठी पदर मोड ही करावी लागेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज नवीन संधी चालून येतील.कामे पार पडतील.मैत्र मंडळी सोबत गप्पा रंगतील.तुम्ही हवेसे वाटा ल.भेटवस्तू मिळतील.राजकिय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुसंधी चालून येईल.

मीन:- मैत्रिणींनो आज कामात प्रसिद्धी मिळेल.सामजिक क्षेत्रात नेतृत्व कराल.सन्मान मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular