लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
शनिवार, 11ऑक्टोबर 2025*. अश्विन कृष्ण पंचमी
राहू काळ – सकाळी 9 ते 10:30
आज दुपारी 2 नंतर चांगला दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ आहे.
11 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव आहे. तुम्ही अतिशय हळवे असून फार लवकर मनातून अस्वस्थ होतात. तुम्हाला कोडे सोडवणे. लॉटरी यांचा नाद असतो. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेणारे आहात. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक असतो. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागा स्वीकारतात आणि यशस्वी होतात. स्वभावाने तुम्ही शांत असलात तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करत नाहीत. भाषणे, लेखन, रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती करतात. तुम्ही समाजप्रिय, नाविन्याची आवड असणारे तसेच प्रवासाची आवड असणारे आहात. तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. तुमचा सहवास इतरांना प्रेरणादायक असतो. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा आहे. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे भेदभाव करू शकतात. तुम्ही कल्पनारम्य आणि उत्साही आहात तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील आहात. तुम्ही सतत कार्य मग्न असतात. तुम्ही विनम्र असून इतरांच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित होतात. विनाकारण काळजी करण्याचा तुमचा स्वभाव असून त्यामुळे तुम्ही दुःखी कष्टी असता.
लवकर लग्न करण्याकडे तुमचे प्रवृत्ती असते .वैवाहिक जीवनातल्या आणि अडचणींना यशस्वीपणे तोंड देऊ शकतात .उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात. तुम्ही हुशार, हरहुन्नरी व कर्तुत्ववान असून पतिशी जुळवून घेणाऱ्या आहात. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जणांची संख्या बरीच असते घरात बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. महत्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होऊ शकतात .विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना तुमचा मत्सर वाटतो .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्याचे शौकीन असतात.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज फारशी अनुकुलता नाही.कौटुंबिक वातावरण अशांत राहील.वाहन काळजीपूर्वक चालवा.
वृषभ:- मैत्रिणींनो आज दिवसभर कामात मग्न रहाल.वडिलांकडून ,मैत्र मंडळींकडून लाभ होईल.आर्थिक प्राप्ती चांगली राहील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज वडिलांशी जमवून घ्या.कामात अडथळे येतील.खर्च ही होईल.
कर्क:-मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.सरकारीकामात यश.महिलांच्या मार्फत लाभ होईल.
सिंह:- मैत्रिणींनो आज नोकरीत वरिष्ठ लोकांशी जमवून घ्यावे लागेल.आर्थिक नियोजन करा.वाद टाळा.
कन्या:- मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. धनप्राप्ती होईल. कामात भरघोस यश मिळेल. तुमचे वर्चस्व राहील.आरोग्य उत्तम राहील.विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळेल.रेंगाळलेली कामे पूर्ण कराल.
तुळ:-मैत्रिणींनो आज आरोग्याकडे लक्ष द्या.मन अस्वस्थ राहील.वाहन जपून चालवा.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज पतीशी मतभेद होऊ शकतात. प्रवास घडेल.
धनु:-मैत्रिणींनो आज हाताखालच्या कामगारांची मदत होईल.नवीन खरेदी होईल. आवडत्या गोष्टी त रमाल.
मकर:- मैत्रिणींनो आज कामात नवीन संधी चालून येतील.बढती ची शक्यता. व्यवसायात लाभ होईल.आर्थिक स्थिती मजबुत होईल.
कुंभ:- मैत्रिणींनो तुमच्या चतुर्थ स्थानी चंद्र आहे. जमीन विषयक कामात यश मिळेल.वाहन सौख्याचा दिवस.सामजिक कार्यात सहभाग घ्याल.
मीन:- मैत्रिणींनो आज आत्मविश्वास वाढेल.सामजिक मानसन्मान मिळेल.कामाच्या ठिकाणी शाबासकी ची थाप मिळेल.मेहनतीला यश लाभे