लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025. अश्विन कृष्ण चतुर्थी
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12
आज कृतिका वर्ज्य दिवस आहे” संकष्टी चतुर्थी, करक चतुर्थी
चंद्रोदय मुंबई:-8:53 रात्रौ
नासिक:-8:43 रात्रौ
आज जन्मलेल्या बाळाची
रास वृषभ .
10 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास न करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे. बढाईखोरपणा आणि उतावळेपणा टाळला पाहिजे. वयाच्या 45 व्या वर्षी उत्कर्ष होतो. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते. तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो .स्वभाव रूढीनिष्ठ नसतो. स्वतःचा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालता. महत्वकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता.उत्तम गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असता.
शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज कटू बोलण्याने दुखवू नका. चीजवस्तू सांभाळा. कामे रेंनगाळतील.
वृषभ:- मैत्रिणींनो आज अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. मस्त शॉपिंग ला जाल. मनाला आनंद देणारी बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज महत्वाची कामे पुढे ढकला .मोठे खर्च उदभवतील. प्रवासाचे योग.
कर्क:-मैत्रिणींनो आज अचानक आर्थिक लाभ होतील. मनमुराद जगाल. नवीन शुभारंभ करण्यासाठी उत्तम काळ.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते. मैत्र मंडळी सोबत मजेत वेळ जाईल.
सिंह:- मैत्रिणींनो आज नोकरीच्या ठिकाणी शाबासकीची थाप मिळू शकते. सुखद आनंदी घटना घडतील.मनाप्रमाणे दिवस जाईल.
कन्या:- मैत्रिणींनो आज थकवा जाणवेल. योग्यते प्रमाणे मान मिळणार नाही,अपमानास्पद प्रसंग येऊ शकतो. खर्च होईल.
तुळ:-मैत्रिणींनो आज आरोग्याचे प्रश्न सतावतील. पतीची नाराजी राहील. आरोग्यासाठी खर्च होईल.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज वैवाहिक सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील.सौख्याचा दिवस.
धनु:-मैत्रिणींनो आज अचानक धनलाभाची शक्यता. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडेल.नवीन ओळखी होतील.
मकर:- मैत्रिणींनो आज पंचमात चंद्र आहे. मन अनुत्साही राहील. महत्त्वाची कामे योग्य मार्गदर्शक घेऊन करा.संतती साठी खर्च होईल.त्यांचे हट्ट पुरवावे लागतील.
कुंभ:- मैत्रिणींनो आज घरगूती कामात व्यस्त रहाल.पैशाची चिंता वाटेल.आरोग्य सांभाळा. खर्चिक दिवस.
मीन:- मैत्रिणींनो आज नवीन वस्त्र लाभ होईल, सुखद अनुभव येतील. मैत्र मंडळी भेटतील.दूरच्या मैत्रिणींशी संवाद घडेल.अचानक सुखद समाचार मिळेल.