लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
मंगळवार, 7ऑक्टोबर 2025*. अश्विन पौर्णिमा/कृष्ण प्रतिपदा
राहू काळ – दुपारी 3 ते 4:30
आज क्षय तिथी, कार्तिक स्नान आरंभ,जेष्ठ अपत्यास ओवाळणे. नवान्न पौर्णिमा .
आज जन्मलेल्या बाळाची रास मीन आहे.(धृव, व्याघात योग शांती)
7 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:- मैत्रिणींनो आज महत्वाची कामे पुढे ढकला. व्यय स्थानी चंद्र आहे. वाहन चालवताना काळजी घ्या,प्रवास शक्यतो टाळा.आरोग्य सांभाळा.
वृषभ:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. मैत्र मंडळी मार्फत लाभ होऊ शकतो. वाहन दुरुस्ती संभवते.मात्र मन उत्साही राहील.
मिथुन:-मैत्रिणींनो आज कामाचा तणाव वाढेल.आपली मते इतरांवर लादू नका.संतती च्या शिक्षणाकडे लक्ष द्या.शिक्षण ,बँक क्षेत्रात
इत्यादी काम करणाऱ्याना जास्त मेहनत घ्यावी लागेल.
कर्क:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे.गोड बोलून कामे करून घ्या.कोणालाही दुखवू नका.मोह टाळा.
सिंह:- मैत्रिणींनो आज चन्द्र अष्टमात आहे.महत्वाची कामे पुढे ढकला.वाहन चालवताना काळजी घ्या.पती कडून अनपेक्षित लाभ होतील, भेटवस्तू मिळेल.
कन्या:- मैत्रिणींनो आज आळस दूर करून कामे करावी लागतील.सुसंवादातून लाभ होतील.जोडीदाराची साथ लाभेल.कामात नवीन संधी चालून येतील.
तुळ:- मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने उत्तम दिवस. सहकार्याकडून गोड बोलून कामे करून घ्याल.धार्मिक कार्य कराल.संतती कडून खूष खबर मिळेल.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. आरोग्य नरम गरम राहील.थकवा जाणवेल.तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर होईल.अचानक खर्च वाढेल.
धनु:-मैत्रिणींनो आज वास्तू मध्ये मंगलमय कार्य करा.कामाचा तणाव वाढेल.एखादा चुकीचा निर्णय आर्थिक बाबतीत घडू शकतो.
मकर:- मैत्रिणींनो आज रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.घरातल्या वृद्धांची काळजी घ्या.चीजवस्तू जपा.चोरी चे भय आहे.
कुंभ:- मैत्रिणींनो आज मुलांशी मतभेद होऊ शकतात.आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्याल. कौटुंबिक सौख्याचा.तब्येतीची काळजी घ्या.कुटुंबियांच्या वर खर्च कराल.सरकारी कामे रखडतील.
मीन:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.एखादा निर्णय घेताना जड जाइल.घरगूती कामात व्यस्त रहा.