लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
रविवार, 5 ऑक्टोबर 2025. अश्विन शुक्ल त्रयोदशी
राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज चांगला दिवस ,आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ असून गंड योगाची शांती करून घेणे.
घबाड सकाळी 8:01 नंतर. दुपारी 3:05 पर्यंत.
5 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य वापरण्याची आवड असते. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमतात. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असता. आरोग्याने सुदृढ असतात चाकोरी बद्ध आयुष्य तुम्हाला आवडत नाही, तरीही तुम्ही स्वभावाने नम्र असता.पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरात टापटीप व्यवस्थितपणा असतो ,पण ही कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात तुम्ही पटाईत असतात.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)