लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/10/2025 शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे उदगीर जळकोट मतदार संघात पूरग्रस्ताच्या भेटीसाठी काल दिनांक 2/ 10 /2025रोजी भेटी घेतल्या. उदगीरचे माजी आमदार तथा प्रवक्ते शरद पवार गट सुधाकर भालेराव यांनी उदगीर जळकोट मतदार संघात पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी व येथील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांना बोलावून घेतले. व पाहणी केली. व प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन आमदार रोहित पवार सोयाबीनची व इतर पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला . वेळ सांगवी येथील बॅरिजेसची पाहणी करून त्या कामाबद्दल विशेष चौकशी करू अशी आश्वासन तेथील शेतकऱ्यांना दिले. तिरुका नळगीर या भागात पाहणी केली होती तिरु नदीवरील वरील बॅरिजेसची पाहणी करून त्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे उघड करण्यासाठी आपण तो प्रश्न मार्गी लावू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा आश्वासन तिरका येतील सर्व ग्रामस्थांना दिले. दुपारी आमदार सुधाकर भालेराव संग्राम निवास येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन पत्रकार परिषद संपन्न केली. फोटोग्राफी अजित थोरे.