लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 27/9/2025 मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ म्हणतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा कोविड काळात 600 कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये जमा झाले .आणि ते खर्च करू शकले नाहीत अशी खंत व्यक्त करत .असताना मला किव येते मुख्यमंत्री साहेबांची …!
अनुसूचित जाती सामाजिक न्याय खातं अनुसूचित जमाती आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेलं खातं या खात्याचे पैसे लाडक्या बहिणीसाठी वळवले जातात. हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ओरडून सांगतात पत्रकार परिषद घेऊन सांगतात .असे पैसे तुम्हाला या खात्याचे जे की कुठे हि खर्च करता येत नाही .त्या खात्याचे पैसे मात्र तुम्हाला राजकारणासाठी दिलेले आश्वासन पूर्तीसाठी वळवता येतात. आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात शिल्लक असलेले पीएम केअर चे पैसे कुठे खर्च करावे कसे खर्च करावे हे कळत नाही .हे किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवाभाऊ आपण करत आहेत. फक्त विरोधकांना टार्गेट करून जनतेची डोळ्यात धूळ फेक करत आहेत .हे थांबवा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या बळीराजा शेतकऱ्याला मदत जाहीर करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल …???
सुधाकर भालेराव मा आमदार उदगीर जिल्हा लातूर
प्रवक्ते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)