Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

गुरूवार, 25 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल तृतीया/चतुर्थी

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज वैधृती वर्ज्य दिवस आहे.
विनायकी चतुर्थी
आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ .(वैधृती योग शांती)

25 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर बुध ,चन्द्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. कोणत्याही एका विषयात फार काळ तुम्ही रमत नाही त्यामुळे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असूनही कोणत्याही विषयावर प्रभुत्व नसते. प्रवासाची आवड असून परदेशाशी संबंध येतात .तुम्ही प्रामाणिक ,विश्वासू व निष्ठावान असतात. स्वभाव अति चंचल असतो. स्मरणशक्ती चांगली असते .स्वतःच्या प्रेमा संबंधित मी निराश असता. विचारात व कृतीत स्वतंत्रपणे असून कोणाचेही वर्चस्व खपत नाही. भावनांवर ताबा असतो. स्वतःचे गुण दाखवण्याची संधी तुम्हाला मिळावी लागते. भाषण ,लिखाण रेडिओवरील नाट्य इत्यादी कामात तुम्हाला यश मिळते .त्यामुळे तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते. आवडीची नोकरी मिळाली तर जीवनात चांगला पैसा मिळू शकते शकतो .सर्व सुख सोयी उपलब्ध करण्याकडे कल असतो. वयाच्या 34 वर्षानंतर आर्थिक स्थैर्य मिळते.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आजचा उत्साही दिवस.मनाप्रमाणे कामे होतील. पतीची साथ लाभेल.आनंदायी बातमी कळेल.हितशत्रूं चा त्रास कमी होईल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज कामाच्या बाबतीत मन साशंक राहील.प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.त्यावर वेळीच उपचार करा.वाहन काळजीपूर्वक चालवा.

मिथुन:- मैत्रिणींनो आज उत्तम दिवस आहे. समस्येवर उपाय मिळतील. तुमचे वर्चस्व वाढेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज आवडत्या कामासाठी वेळ द्याल.मन धार्मिक राहील.प्रसिद्धी मिळेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज तुमची प्रशंसा होईल.पराक्रम गाजवाल इतरांना मदत कराल.
काटकसरी स्वभाव दिसून येईल.

कन्या:- मैत्रिणींनो आज चांगला दिवस.चौकस स्वभावाने लाभ होईल.नवीन वस्तू खरेदि होईल.कल्पनाशक्ती चा प्रभाव पडेल.

तुळ:-मैत्रिणींनो आज अति व्यवहारी स्वभावावर नियंत्रण ठेवा.सामजिक कार्यात तुमच्या बुद्धीने इतरांचा लाभ करून द्याल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज फारशी ग्रहमानाची अनुकुलता नाही.मनन कराल.काही निर्णय चुकू शकतात, महत्वाची कामे पुढे ढकला.

धनु:-मैत्रिणींनो आज पतीचे सहकार्य मिळेल.नवीन संधी चालून येतील.शेअर्स मध्ये लाभ होईल.

मकर:- मैत्रिणींनो आज चिकाटीने यश मिळेल.यंत्र हाताळताना काळजी घ्या.कामात इतर विचार मनात आणू नका.एकाग्रता साधा.

कुंभ:- मैत्रिणींनो आज नकारात्मक विचार मनातुन निघून जातील.वाहन सौख्याचा दिवस.आवडत्या खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती ची भेट घडेल.मोठे प्रवासाचे योग येतील.राहू मंत्र जप करा.

मीन:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. कामात बदल घडेल.वाहन काळजीपूर्वक चालवा.तुमच्या पेक्ष्या कनिष्ठ कामात बाजी मारतील.सबुरीने घ्य

RELATED ARTICLES

Most Popular