लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
बुधवार, 24 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल तृतीया
राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30
आज वृद्धी तिथी आहे” सप्तनवरात्र उत्सव आरंभ आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ असून ऐन्द्र योग शांती करणे.
24 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे.
समाजात तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात ओळखी व जाणे येणे असते .विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला लाभ होत होतो .मैत्रिणींबद्दल प्रेम असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने तुम्ही लढता .खोटा अभिमान व माननीय तुमच्यात असतो कायद्याचे पालन करायला तुम्हाला आवडते. पाण्याजवळ तुमचा भाग्योदय होतो. कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. वयाच्या 33 वर्षापासून उत्कर्ष होतो. विवाहानंतर भाग्योदय होतो व श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो. स्वतंत्र विचार व आत्मविश्वास या गोष्टीमुळे सर्व गोष्टी आपल्या हातात ठेवण्याची वृत्ती असते. हुशार व बुद्धिमान वर्तुळातच वावरणे तुम्हाला आवडते. तुम्ही जन्मताच कलाकार व कलाप्रिय असता. तुम्ही तुमच्या कलेचा धूर्तपणे व व्यावसायिक दृष्ट्या वापर करतात .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असून ती त्याचा पुरेपूर व्यवसायात वापर करता. तुमच्या सहवास इतरांना सुखावह होतो. सामाजिक रूढी व बंधनांना तुम्ही वाटा देता. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे कल असतो. संभाषण कलेत प्रवीण असता.जीवनात अधिकार व मान मिळतो .आयुष्य आरामदायक व सुखभोग घेण्याकडे कल असतो. सुगंधी द्रव्य ,आकर्षक कपडे यांचे तुम्ही शौकीन असता. अनपेक्षित पणे पैसा मिळतो ,परंतु बचत करण्याची प्रवृत्ती नसते. केलेल्या कष्टाचे चीज होते .तुमची आर्थिक बाजू समाधानकारक असते. तुम्ही आरोग्याने सुदृढ असता. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. पण तिला योग्य ती साथ तुम्ही देता. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. एक निष्ठावान जबाबदारी व पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता. जे लोक आकर्षक ,बुद्धिमान, विचारवंत धडाडीचे, कलेवर प्रेम असलेले आहेत अशा अशांकडे तुम्ही आकर्षले जातात.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज वाहन सौख्याचा दिवस.पतीकडून छानशी भेटवस्तू मिळू शकते.आवडत्या व्यक्ती शी भेट घडेल. नवीन ओळखी होतील.
वृषभ:- मैत्रिणींनो आज नोकरीच्या ठिकाणी महिला सहकारी मदत करतील.स्त्रियांकडून लाभ होईल.
मिथुन:-मैत्रिणींनो आज उत्साह वाढेल. बहिणी कडून लाभ होईल.आवडत्या व्यक्ती भेटतील, प्रेमात यश.अधिकार वाढेल.
कर्क:-मैत्रिणींनो आज उत्साह वाढवणारा दिवस.सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.घरातील सजावटीसाठी खर्च कराल.
सिंह:- मैत्रिणींनो आज रोमँटिक दिवस अनुभवाल. नवीन वस्त्रे, दागिने खरेदी होईल. नात्यातून भेटवस्तू मिळू शकते.
कन्या:- मैत्रिणींनो आज मनासारखे आर्थिक लाभ होतील. मौजमजेवर खर्च कराल.कठोरपणे बोलणे टाळा.छोटी सहल घडेल.
तुळ:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र मंगळ युती आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग् आहेत.गाणे,नृत्य इत्यादींचा आस्वाद घ्याल.स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज कामात महिलांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ ही होतील.चिडचिड होऊ शकते.स्वतःवर खर्च कराल.
धनु:-मैत्रिणींनो आज संपत्ती वाढेल.उत्साहीत रहाल.विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळू शकतो. मनोरंजक कार्यक्रमात सहभाग घ्याल.आनंदी दिवस.प्रेमात यश.
मकर:-मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक आवक राहील.पतीची मर्जी सांभाळावी लागेल.कामाचा ताण वाढेल.महिला सहकारी साथ देतील.
कुंभ:- मैत्रिणींनो आज कामाचा उत्साह वाढेल.पतीसोबत धार्मिक।यात्रा घडू शकते.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.
कुलदेवतेची कृपा राहील.
मीन:- मैत्रिणींनो आज देणी द्यावी लागतील.वागण्यातून गैरसमज टाळा.वाहन जपून चालवा.राग टाळ