Homeईपेपरसामाजिक लेख आईची संस्कार.

सामाजिक लेख आईची संस्कार.

नाशिक प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 22/9/2025 आई काय असते हे सर्वजण जाणून आहेत. परंतु या धक्काबुकीच्या जीवनामध्ये. या फोर जी सिक्स ची सोशल मीडिया मोबाईल इंटरनेट तंत्रज्ञान या युगामध्ये आई हरवली का अशी चिंता होती . आजकालची आई ही आयटी इंजिनियर बँक अधिकारी अनेक प्रकारच्या शासकीय अशासकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत .त्यात दुमत नाही. परंतु आई काय आहे ही पण फार मोठी जीवनाची प्रतिमा आहे. पूर्वी काळी आईच्या माध्यमातून आपण त्यांच्या दृष्टीने आपण हे जग पाहिलं . आता पण या आयटी क्षेत्रामध्ये मोबाईल असो इंटरनेट असो सोशल मीडिया असो आज पण आपण आईच्या माध्यमातून आपण दुनिया पाहतो. जीवनातली पहिली गुरु ही आईच असते. लहानपणी ते पहा बाळा अशा गोड बोलण्यातून आई आपल्या लहान बाळास संस्कार देत असते. म्हणून आई ही फार महत्त्वाची आपल्या जीवनासाठी आहे. आज प्रत्येक आईने आपल्या बाळांकडे लक्ष देऊन मोबाईल पासून इंटरनेट पासून कसे दूर राहत आहे ही काळजी घेणे गरजेचे आहे.. मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया ही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु जोपर्यंत आपल्या बाळाला समज येत नाही चांगले वाईट कळत नाही तोपर्यंत ह्या तंत्राच्या दूर ठेवून संस्कार दिले पाहिजे .व त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे देवपूजा असो आणि देव मानो अथवा न मानो कोणी कुठल्या धर्माचा असो धर्माने आपापल्या देवावर श्रद्धा ठेवून हे संस्कार देणे गरजेचे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज असो ज्ञानेश्वर माऊली असो सोपान काका असो अनेक संत महात्मे त्यांच्या माध्यमातून त्यावेळेस आपण कसे जगावे ही त्यांनी फार सुरेख असा दृष्टांत देऊन ठेवला आहे. आज तू दृष्टांत ते आचरण घेऊन आपण आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या लेकरांना सुसंस्कार कशी देता येतील व आपला मुलगा असो या मुलगी असो माणूस म्हणून कशी जगेल किंवा कसे वावरेल हे आपण त्यांना संस्कार देणे फार महत्त्वाचे आहे

जग महासत्तेकडे आहे यात काही दुमत नाही. परंतु ह्यापेक्षाही आपल्या नवतरुण पिढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेस्ताचे प्रमाण वाढले आहे व शाळा कॉलेजमध्ये अनेक प्रकारचे व्यसन जेणे करून आपण आतापर्यंत नाही ऐकले अशा प्रकारचे व्यसनाधीन नवीन पिढी होता दिसत आहे . त्यासाठी या बाबीकडे गांभीर्य लक्ष घातले पाहिजे व आपण सुद्धा आपल्या मुलाबाळास संस्कार नीट देऊन आपल्या कुटुंबाची आपल्या देशाची प्रगती कशी करता येईल आणि आपले कुटुंब कसे संस्कारित होईल याकडे आईने आणि वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वरील प्रमाणे प्रत्येक जण प्रत्येक माता जर ह्याप्रमाणे संस्कार देत असेल तर आपला देश महासत्ता तर काय संस्कार च्या बाबतीमध्ये जगाच्या पुढे जाईल यातील मात्र शंका नाही. म्हणून आई ही गुरु आहे त्या गुरुला आपण पूजलं पाहिजे.

.

RELATED ARTICLES

Most Popular