लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
सोमवार, 22 सप्टेंबर 2025
अश्विन शुक्ल प्रतिपदा
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
“आज उत्तम दिवस”घटस्थापना, मातामह श्राद्ध
आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या(कींस्तुघन करण शांती)
22 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे.
तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे चांगले असतात. स्वभावात अस्थिरता असते. विरुद्ध लिंगी व्यक्ती पासून फायदा होतो. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. मित्रपरिवार अतिशय छोटा असतो भांडण्याची फिकीर करत नाहीत. तुमच्या दिमाख व प्रतिष्ठा असून कर्तुत्वाला लवकरच मान्यता मिळते. आयुष्यातील 40 ते 60 ही वर्ष महत्त्वाचे असून सर्वोच्च यशाचा काळ असतो. जीवनातील पहिला भाग कष्टदायी असला तरी उर्वरित भाग यशाचा व महत्त्वकांक्षा सफलतेचा असतो. काही वेळा तुम्हाला एकटे पण जाणवते. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे परंतु ओढा नाही. तुम्ही चला व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यात हातखंडा असतो. टापटीप आवडत असली तरी स्वतः फारसे कष्ट करीत नाहीत.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. आर्थिक लाभ होतील.सामजिक क्षेत्रात चमकाल.खाण्याची पथ्ये पाळा.
वृषभ:- मैत्रिणींनो आज सौख्याचा दिवस.वाहन खरेदी होईल.शेअर्स मध्ये लाभ होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरात काही बदल कराल.बागकामाचा छंद जोपासना कराल.
कर्क:-मैत्रिणींनो आज तृतीयात चन्द्र आहे,अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. भावंडाशी हितगुज कराल.मानसिक सौख्याचा दिवस.
सिंह:-मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. पतीची मर्जी राहील. मोठ्या जबाबदाऱ्या पार पडाल.गोड बोलून फायदा होईल.विक्री व्यवसायात यश.
कन्या:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.छोटा प्रवास घडेल.अवघड प्रश्न चुटकीसरशी निकाली काढाल.
तुळ:-,मैत्रिणींनो आज नवीन वस्तू खरेदी कराल. घरातले वातावरण आनंदी राहील.वाहन काळजीपूर्वक चालवा.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज तुमचे वर्चस्व राहील.पतीचे सहकार्य मिळेल. जुन्या मैत्रिणींशी भेट घडेल. गप्पा रंगतील.मनाप्रमाणे कामे होतील.
धनु:-मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक यश मिळेल. बढती ची शक्यता. उत्साह वाढेल.
मकर:- मैत्रिणींनो आज कामाचा तणाव वाढेल.न आवडणारे काम करावे लागेल.त्या मुळे मन उदास होईल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज अष्टम स्थानी चंद्र आहे. आराम करण्याचा मूड राहील.पण आळस झटकून कामाला लागावे लागेल.मैत्रिणींना मदत करावी लागेल.
मीन:- मैत्रिणींनो आज स्वतः मध्ये बदल कराल..कामाचा उत्साह वाढेल.महिलांच्या गैरजमजातून त्रास होऊ शकतो. साडेसाती चा त्रास जाणवे