Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

गुरूवार, 18 सप्टेंबर 2025. भाद्रपद कृष्ण द्वादशी

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज उत्तम दिवस आहे. गुरुपुष्यमृत आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क.

18 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सध्या व मोठ्या मनाचे आहात .मित्र-मैत्रिणींशी प्रामाणिक असतात .सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या निभावण्यात तुम्हाला यश मिळते .प्रकृती सुदृढ असते. वक्तृत्व ,स्वतंत्रपणा ,हरहुन्नरी पणा ही तुमची वैशिष्ट्य आहेत. मोठेपणा प्रतिष्ठा मान यांना अधिक महत्त्व देता. जीवनातील खरा आनंद हा शिकवण्यात व अभ्यास करण्यात आहे असे तुम्हाला वाटते .दुसऱ्याला शिकवण्यात तुम्हाला आनंद वाटतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होतो .तुमची स्मरणशक्ती उत्तम असून भूतकाळातल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे आठवतात. 

तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत,खोडी काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. तुमचे विचार ठाम असतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला तुमचे कुटुंब प्रिय असते आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आहात आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुम्ही पोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत. तुम्ही महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. आपल्या पतीला त्याचे व्यवसायात मदत करता,सोबत स्वतःचे हि व्यवसाय किंवा नोकरी करून उत्पन्नात वर घालता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सार्वजनिक जीवनात यश मिळते. टाकते व स्वच्छता याकडे जातीने लक्ष देतात. स्वभाव तापट असूनही संयम दाखवता.पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान असता. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .खर्चिक स्वभाव असून आवडत्या व्यक्तीसाठी पैसे खर्च करताना मागेपुढे पाहत नाही .पैशामुळे जेवढी सुख उपभोक्ता येतील त्याचा आनंद लुटता.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज गृह सौख्याचा दिवस.घरगुती कामे पूर्ण करा.त्यासाठी खर्च वाढेल.धीर धरा.

वृषभ:- मैत्रिणींनो आज चंद्र अनुकूल आहे. कठोर निर्णय घ्याल.तरीही लाभ होतील.

मिथुन:- मैत्रिणींनो आज तुमच्या मिश्किल, हजरजबाबी स्वभावाचा फायदा होईल.बौद्धिक चमक दिसेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज नवीन एखादा पदार्थ कराल,त्यात यश मिळाल्याने आनंदी मूड बनेल.धनलाभ होण्याची शक्यता. मनपसंद खाण्यासाठी खर्च कराल.

सिंह:- मैत्रिणींनो आज खर्च होईल मात्र आवक ही वाढेल. रुटीन चालू ठेवा.

कन्या:- मैत्रिणींनो आज हसतमुख, निर्मळ स्वभावाचा लाभ होईल.मन प्रसन्न राहील.दत्तगुरूं ची उपासना करा.

तुळ:-मैत्रिणींनो आज सौख्य लाभेल.खर्च होईल,संध्याकाळ आनंदाची. विनाकारण वाद टाळा.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. इतरांना मत्सर वाटेल.सावध रहा.मनातील गोष्टी उघड करू नका.

धनु:-मैत्रिणींनो आज सबुरीने वाटचाल करा, परिस्थितीत लवकरच बदल होईल.लाभतील मंगळ धैर्य, मानसिक ताकद वाढवेल.संतती विषयी चिंता वाटेल.

मकर:- मैत्रिणींनो आज कामातील सातत्य, चिकाटी यश देईल.वस्त्र भेट मिळतील.भेटवस्तू मिळेल.सौख्याचा दिवस.

कुंभ:- मैत्रिणींनो आज रेंनगळलेली कामे पूर्ण कराल.आर्थिक लाभ ही होतील. कनिष्ठ लोकांकडून काम करवून घ्यावे लागेल.

मीन:- मैत्रिणींनो आज तुमच्या कामात आळंमटळंम चालणार नाही. कामात बदल घडेल. सावधतेने वाटचाल कर

RELATED ARTICLES

Most Popular